New Car Buying Tips : नवीन कार खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या, वाचू शकतात हजारो रुपये

Car Buying Tips : नवीन कार घेताना तुम्ही अनेक मार्गांनी पैसे वाचवू शकता.
New Car Buying Tips
New Car Buying TipsSaam Tv
Published On

New Car Buying Guide

प्रत्येकाला आपले हक्काचे वाहन असावे असे वाटते. आपल्या सेव्हिंग्जमधून अनेक लोक कार, बाईक खरेदी करतात. परंतु कोणतेही वाहन खरेदी करताना घाई करु नये. अन्यथा महागात पडेल. अनेकांना कार खरेदी करण्याची इच्छा असते.

बजेट आणि इतर गोष्टी जुळून आल्या की आपण उत्साहात वाहन खरेदी करतो. परंतु घाईत वाहन खरेदी करताना तुम्हाला एक्सट्रा पैसे द्यावे लागू शकतात. तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. नवीन कार घेताना तुम्ही अनेक मार्गांनी पैसे वाचवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

New Car Buying Tips
WhatsApp Update: काय सांगता! QR कोड वापरुन करता येणार व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह, फक्त या ३ स्टेप्स फॉलो करा

या मार्गांनी वाचवू शकता पैसे

कार विमा

कार खरेदी करताना विमा समाविष्ट असतो. बहुतेक डिलर्स ग्राहकांना महाग विमा जोडतात. कार खरेदी करण्याच्या उत्साहात ग्राहक या गोष्टींना बळी पडतात. यामध्ये विमा उतरवून तुम्ही पैसे वाचवू शकतात. विमा घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्या पॉलिसीचा विचार करु शकता. जिथे चांगली ऑफर मिळेल अशा त्या ठिकाणी विमा निवडा. जर तुमच्याकडे जुन्या कारचा विमा असेल तर तो तुम्ही नवीन कारसाठी वापरु शकता. नो क्लेम बोनसचा लाभ घ्या.

कारमधील अॅक्सेसरीज

कार खरेदी करताना तुम्हाला कारमध्ये गरजेच्या अॅक्सेसरीज घेणे आवश्यक आहे. परंतु डिलर्स तुमच्या गरजेचा फायदा घेऊन तुम्हाला महाग किमतीत या गोष्टी देतात. या अॅक्सेसरीज तुम्ही बाहेरून कमी किमतीत खरेदी करु शकतात. जेणकरुन तुमचे पैसे वाचतील.

New Car Buying Tips
Parenting Tips : वयात आलेल्या मुलीशी आईने या महत्वाच्या विषयांवर चर्चा करणं आवश्यक, वाचा सविस्तर

कार कर्ज (Car Loan)

तुम्ही कर्जावर कार खरेदी करत असाल तर कर्जाची नीट चौकशी करा. कार डिलर्स कर्जासाठी काही बँकाना प्राधान्य देतात. तुम्ही कार खरेदी करताना तुम्ही वेगवेगळ्या बँकाचे कार लोन तपासा. अनेक ठिकाणी तुम्हाला चांगली डील मिळू शकते. त्यामुळे तुमचा खर्च कमी होईल.

एक्सटेंडेट वॉरंटी

अनेक कार कंपन्या २ ते ३ वर्षाची वॉरंटी देतात. काही कंपन्या ५ वर्षासाठी एक्स्टेंडेट वॉरंटी देतात. यासाठी तुमचा अधिकचा खर्च होईल. परंतु सध्या ज्या आधुनिक कार आहेत. त्यांना अधिक काळ रिपेअरिंगची गरज नसते. व्यवस्थित काळजी घेतली तर कारला खूप दिवस व्यवस्थित चालतात. यामुळे तुम्ही एक्सटेंडेट वॉरंटीवरचा खर्च टाळू शकता.

New Car Buying Tips
Shri Krishna Janmashtami 2023 : बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया...श्री कृष्ण जन्माष्टमीला भेट द्या द्वारकानगरीला, कसे जाल?

कार व्हेरियंट

तुम्ही कारचा व्हेरियंट निवडतानाही मोठी बचत करु शकता. तुम्हाला अॅडव्हान्स सिस्टम, सनरुफ, इतर नवीन फिचर्ससह नवीन व्हेरियंटची कार घ्यायची असेल तर ते तुम्हाला महागात पडेल. जर तुम्ही या वैशिष्ट्यांशिवाय कार खरेदी करु शकत असाल तर, तुम्ही स्वस्त व्हेरियंटची कार घेऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com