Left side sleeping benefits saam tv
लाईफस्टाईल

Sleeping position: या कुशीवर झोपल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी; कार्डिअॅक आयसीयूमधील नर्सचा मोठा दावा

Left side sleeping benefits: डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावरील ताण कमी होऊन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होऊ शकते, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. झोपण्याची योग्य पद्धत हृदयाचं आरोग्य, श्वास घेण्यातील अडचणी आणि स्लीप अॅप्नियावरही सकारात्मक परिणाम करू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

रात्री झोपताना आपण कोणत्या कुशीवर झोपतो, याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा दावा अमेरिकेतील एका अनुभवी नर्सने केला आहे. जवळपास 20 वर्ष कार्डिअॅक आयसीयूमध्ये काम केलेल्या पॅट्रिशिया मूर यांनी रात्री डाव्या कुशीवर झोपण्याची सवय हृदयासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असं सांगितलंय. त्यांनी तीन हजारांहून अधिक हार्ट अटॅक रुग्णांवर निरीक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष मांडला आहे.

ताण कमी होण्यास मदत

पॅट्रिशिया मूर यांच्या मते, डाव्या कुशीवर झोपल्याने हृदयावरील ताण कमी होतो आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्या म्हणाल्या की, उजव्या कुशीवर किंवा पाठीवर झोपल्यास हृदयावर अतिरिक्त दाब येऊ शकतो. त्याउलट डाव्या बाजूला झोपल्याने रक्ताभिसरण जवळपास ४० टक्क्यांनी सुधारण्यास मदत होते.

डॉक्टरांच्या मते, झोपण्याची पद्धत ही केवळ आरामापुरती मर्यादित नसून तिचा हृदयाशी संबंधित अनेक समस्यांवर परिणाम होतो. विशेषतः स्लीप अॅप्निया, श्वास घेण्यातील अडचणी आणि रात्री होणारे हृदयाचे त्रास यांच्याशी झोपेची स्थिती जोडली जाते.

काही संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की, डाव्या बाजूला झोपल्यावर हृदयाची स्थिती शरीरात थोडी बदलते. व्हेक्टरकार्डिओग्राफीच्या मदतीने करण्यात आलेल्या अभ्यासात हृदय डावीकडे सरकतं आणि त्याची हालचाल बदलते.

मूर यांनी सांगितलं की, डाव्या कुशीवर झोपताना गुडघ्यांच्या मध्ये उशी ठेवली तर पाठीचा कणा योग्य स्थितीत राहण्यास मदत होते. अनेक रुग्ण त्यांना उजव्या बाजूला झोपण्याची सवय असल्याचे सांगायचे. मात्र त्या त्यांना सांगायच्या की, “ज्या झोपेच्या सवयीमुळे तुम्ही आयसीयूमध्ये पोहोचलात, तीच सवय बदलणं गरजेचं आहे.”

त्यांच्या मते, सुरुवातीला ही सवय बदलणं अवघड वाटू शकतं. पहिल्या काही दिवसांत झोपेत पुन्हा जुन्या स्थितीत वळण्याची शक्यता असते. पण हळूहळू शरीराला त्याची सवय लागते आणि साधारण तीन आठवड्यांत ही पद्धत नैसर्गिक वाटू लागते.

दरम्यान, काही अभ्यासांमध्ये उजव्या कुशीवर झोपण्याचेही काही फायदे सांगण्यात आले आहेत. विशेषतः हार्ट फेल्युअर किंवा हृदयाची धडधड वाढण्याची समस्या असलेल्या लोकांना उजव्या बाजूला झोपल्यावर अधिक आराम वाटतो. या स्थितीत हृदय शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत वर राहते, त्यामुळे श्वास घेण्यास थोडी मदत होऊ शकते.

‘द अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, काँजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या अनेक रुग्णांनी उजव्या कुशीवर झोपण्याला प्राधान्य दिलं होतं. या पद्धतीमुळे स्लीप अॅप्नियाचे झटके कमी झाल्याचेही संशोधनात दिसून आले. याशिवाय श्वास घेण्यातील त्रास कमी होणं आणि मज्जासंस्थेवरील ताण कमी होणं असे काही फायदेही दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT