Skincare SAAM TV
लाईफस्टाईल

Skincare : जास्त 'मीठ' खाणे त्वचेसाठी ठरू शकते घातक, चेहऱ्यावर येईल अकाली वृद्धत्व..

Shreya Maskar

जेवणाची चव वाढवणारे मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यास हानी पोहचू शकते. शरीराच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्याही उद्भवतात. तुमची त्वचा लवकर खराब होते. शरीरातील वाढलेले सोडीयमचे प्रमाण त्वचेसाठीही घातक ठरते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, झोपेत अडथळा येणे, पचनक्रिया बिघडणे इत्यादी शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात मीठ खाणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. शरीरातील मीठाचे प्रमाण वाढल्यास 'या' समस्यांना सामोरे जावे लागते.

चेहऱ्याला सूज येते

जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय तुमचे चेहऱ्याचे आरोग्य धोक्यात आणू शकते. अतिमीठामुळे चेहऱ्यावर सूज येते. तसचे मोठ्या प्रमाणात मुरुमांची समस्या देखील उद्भवते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात पाणी थांबते. ज्यामुळे शरीरातील पेशींमध्ये पाण्याची कमतरता भासते. परिणामी चेहऱ्याला सूज येते.

त्वचा कोरडी होते

मीठ तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पण तुम्ही जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास त्वचेतील आर्द्रता कमी होते ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. अतिरिक्त मीठ कोलेजन कमी करते.

त्वचा अधिक संवेदनशील बनते

संवेदनशील त्वचा असल्यास जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये. त्यामुळे त्वचेवर लालचट्टे, त्वचेची जळजळ तसेच त्वचेला खाज सुटू शकते. यांसर्वांमुळे तुमची त्वचा आणखीन संवेदनशील होते.

त्वचेची चमक कमी होते.

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू लागतो. परिणामी त्वचेची चमक कमी होते.

किती प्रमाणात मीठ खावे?

प्रत्येकाने पाच ग्रॅम पेक्षा कमी मीठ खायला पाहिजे. तरच आरोग्य चांगले राहील. तुलनेने लहान मुलांनी यापेक्षाही कमी मीठ खावे. बाहेरील पदार्थ आणि फ्रोजन पदार्थ खाणे टाळा. कारण त्यांत जास्त प्रमाणात मीठ असते. जे त्वचेचे आरोग्य खराब करते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates :हरियाणात १० वर्षांनंतर काँग्रेस रिटर्न, जम्मूत भाजपची सत्ता; एक्झिट पोलचे आकडे आले

VIDEO : राज ठाकरे आपल्याच कार्यकर्त्यांवर संतापले; पाहा काय आहे कारण

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

SCROLL FOR NEXT