मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Surabhi Jayashree Jagdish

नकारात्मक परिणाम

रेस्टॉरंटचे चविष्ट वाटणारे पदार्थ अनेकदा आरोग्यासाठी घातक असतात. त्यामुळे या सवयीमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मैदा

स्ट्रीट फूड बनवण्यासाठी अनेकदा पुन्हा पुन्हा वापरलेलं तेल वापरलं जातं. तसंच पदार्थांना फुलवण्यासाठी आणि चविष्ठ दिसण्यासाठी मैद्याचा जास्त वापर केला जातो.

आजारपण

खराब तेल आणि मैद्यामुळे पचनावर ताण येतो आणि शरीरात सूज निर्माण होऊ शकते. अशा अन्नामुळे इम्युनिटी कमजोर होते.

दुष्परिणाम

अनेकांना वाटते मैदा फक्त पोट भरतो, पण त्याचे दुष्परिणाम खूप गंभीर असू शकतात. त्यामुळे त्याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

चरबी

सतत मैदा खाल्ल्याने विशेषतः पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढते मैदा पचायला कठीण असतो आणि तो थेट फॅटमध्ये रूपांतरित होतो. त्यामुळे पोटाभोवती आणि कंबरेवर चरबी साचू लागते.

मेटाबॉलिक डिसऑर्डर

फॅट साचल्यामुळे वजन वाढतं आणि शरीराची मेटाबॉलिक क्रिया बिघडते. यामुळे इन्सुलिन रेसिस्टन्स, पीसीओडी, थायरॉईड यांसारख्या समस्या सुरू होऊ शकतात.

वाईट कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स

वाईट कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि ब्लॉकेज होण्याची शक्यता वाढते.

फक्त कॅलरी देतं

मैदा शरीराला प्रोटीन, जीवनसत्त्वं काहीही देत नाही. त्यात फायबर नसल्यामुळे पचन मंदावते. त्यामुळे ते फक्त रिकाम्या कॅलरी देऊन वजन वाढवते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा