ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु झाल्यावर वातावरणात थंड गारवा निर्माण होतो.
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो.
पावसाळ्यात शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो.
पावसाळ्यात अनेक जागेवर दूषित पाणी येते ज्यामुळे आजार होऊ शकतात. त्यामुळे फिल्टर किंवा पाणी उकळून प्या.
पावसाळ्यात रस्त्यावरचे जंक फूड खाणं टाळा यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
घराच्या परिसरात पाणी साचलं असेल तर ते साफ करा यामुळे मच्छर वाढतात आणि डेंग्यू, मलेरियाची समस्या होऊ शकते.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्सचे सेवन करा यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.