Anti-Ageing Yogasan Saam Tv
लाईफस्टाईल

Anti-Ageing Yogasan: कायम दिसाल तरुण, चेहऱ्यावर येणार नाही सुरकुत्या; अँटी एजिंगसाठी ही योगासने नियमत करा

Anti Aging Skin Care : वयाची तिशी ओलांडल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या दिसू लागतात. हे वृद्धत्वाचे पहिले लक्षण समजले जाते.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी आपण रोज काही ना काही तरी चेहऱ्यावर लावत असतो. प्रदूषण, धूळ आणि वाढत्या वयाच्या परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. वयाची तिशी ओलांडल्यानंतर चेहऱ्यावर हलक्या सुरकुत्या दिसू लागतात. हे वृद्धत्वाचे पहिले लक्षण समजले जाते.

वय वाढले की, केस आणि चेहऱ्यावरुन वयाचा अंदाज बांधला जातो. वाढत्या वयाबरोबरच त्वचेची लवचिकता कमी होते. परंतु, तुम्ही नियमितपणे योग केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील तसेच अधिक सुंदरही दिसाल. योगासने केल्याने रक्ताभिसरण चांगले राहाते. चेहऱ्यावर चमक देखील येते. त्यासाठी कोणती योगासने फायदेशीर ठरतील हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मत्स्यासन

मत्स्यासन हे जमिनीवर चटई पसरुन पाठीवर झोपा. यानंतर डाव्या पायाची बोटे उजव्या हाताने आणि उजवा पाय डाव्या हाताने धरण्याचा प्रयत्न करा. हे करताना तुमचे दोन्ही कोपर आणि गुडघे जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि हळूहळू सोडा असे नियमित केल्याने फायदा (Benefits) होईल.

2. बालासन

बालासन केल्याने पाठ आणि कंबरदुखीपासून सुटका मिळते. कंबर आणि मानदुखीचा त्रास कमी होतो. तसेच तणाव (Stress) आणि चिंतेतून मुक्तता मिळते. हे आसन दिवसातून ३ ते ५ वेळा केल्यास त्वचेसाठी फायदा होतो.

3. भुजंगासन

हा योगा करण्यासाठी चटई पसरवून पोटावर झोपा. यानंतर तुमचा हाताचा कोपरा कमरेजवळ ठेवा. तळवे वरच्या दिशेने ठेवून हळू हळू श्वास घ्या. यानंतर पोटाचा भाग वर उचला आणि 30 सेकंद त्याच स्थितीत रहा. त्यानंतर श्वास (Breath) सोडताना हळूहळू पोट, छाती आणि डोके जमिनीच्या दिशेने खाली आणा. असे नियमित केल्याने त्वचेवर सुरकुत्या येणार नाही. मानसिक तणावातून आपली सुटका होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

Satara: महामार्गावर अपघाताचा थरार! रस्ता ओलांडणाऱ्यांना बसने चिरडलं, एकाचा मृत्यू; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Shivali Parab Photos : "तुम्हारी अदा भी क्या खूबसूरत है..."; शिवालीला पाहून चाहत्यांची विकेट पडली

Watch: धक्कादायक! खेळताना बास्केटबॉलचा पोल अंगावर कोसळला; खेळाडूचा जागीच मृत्यू

Monkey: माकडांना पकडा अन् ६०० रुपये मिळवा; राज्य सरकारकडून निर्देश जारी

SCROLL FOR NEXT