Remove Excess Salt Saam TV
लाईफस्टाईल

Remove Excess Salt : जेवणात मीठ जास्त झालं? घाबरु नका; टेस्टी भाजीसाठी 'या' ट्रिक्स ट्राय करा

Ruchika Jadhav

जेवणात मीठ जास्त होण्याची समस्या प्रत्येक घरात जाणवते. नवीन जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला या समस्या थोड्या जास्त जाणवतात. अशात जेवणात मीठ कमी पडलं तर ठीक असतं. कारण नंतर हे मीठ वाढवता येतं. मात्र जेवणात मीठ आधीच जास्त पडलं तर टेन्शन वाढतं. कारण यातलं मीठ सहज बॅलनस करता येत नाही.

जेवणात मीठ जास्त झालं की चव तर बिघडते शिवाय यामुळे जी व्यक्ती जेवण बनवत आहे त्यावर सुद्धा राग येतो. पदार्थ चांगला न झाल्याने पोटभर जेवण सुद्धा केता येत नाही. काहीवेळा महिला जेवणात मीठ जास्त झालं की, त्यात पाणी ओततात. मात्र असे केल्याने पदार्थ आणखी बेचव होतो. त्यामुळे मीठ जास्त झाल्यावर काय केलं पाहिजे याची माहिती आज जाणून घेऊ.

पिठाचे गोळे मिक्स करा

जेव्हा जेवणात मीठ जास्त होतं तेव्हा पिठाची छान कणीक मळून घ्या. त्यानंतर भाजीमध्ये हे पिठाचे गोळे मिस्क करा. त्यामुळे जास्तीचे मीठ पिठात शोषून घेतले जाईल आणि पदार्थ चांगला बनेल.

ब्रेडचे तुकडे

काहीवेळा जेवण बनवण्याची जास्त घाई असते. त्यामुळे अशावेळी कणीक बनवण्यासाठी जास्त वेळ नसतो. त्यावेळी तुम्ही ब्रेडचे तुकडे यामध्ये मिक्स करू शकता. त्यानेही पदार्थाची चव जास्त वाढते.

बेसन पीठ

या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही बेसन पीठ देखील भाजीत मिक्स करू शकता. त्यासाठी तव्यावर थोडं पीठ भाजून घ्या. त्यानंतर हे पीठ जेवणात मिक्स करा. यामुळे भाजीत मीठ जास्त झाल्यावर ते कमी होण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT