Cheesy Rice Saam TV
लाईफस्टाईल

Cheesy Rice : एकदा चव चाखाल तर खातच राहाल; घरच्याघरी बनाव चीज राईस

Cheese Rice Recipe : तुमची मुलं विविध भाज्या खात नसतील तर आज आम्ही त्यांच्यासाठी एक भन्नाट रेसिपी शोधली आहे. या रेसिपीमुळे मुलं सर्व भाज्या आवडीने खातील.

Ruchika Jadhav

सर्वानांच बाहेरचे पदार्थ खायला फार आवडतात. बाहेरच्या पदार्थांमध्ये चीझ दिसलं की सर्वाच्यांच तोंडाला पाणी सुटतं. मोठ्यांसह लहानमुलं सुद्धा चीज असलेले सर्व पदार्थ आवडीने खातात. घरात जास्तीचं जेवण बनवण्याचा कंटाला आला की, नेहमीच मसालेभात, पुलाव, फोडणीचा भात बनवला जातो. राईसचे हे सर्व प्रकार खाऊन तुम्हीही कंटाळले असाल. अशात तुम्ही कधी चीज राईस ट्राय केला आहे का?

जर नसेल केला तर आम्ही तुमच्यासाठी कमी वेळात बनणाऱ्या चीज राईसची रेसिपी आणली आहे. झटपट तयार होणारा चीज राईस तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. चला जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य

बासमती तांदूळ

लांब कापलेला कांदा, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची, टोमॅटे

मक्याचे दाणे

गव्हाच्या शेवया

चीज

बटर

आल-लसूण पेस्ट

मीठ

काळी मिरी पावडर

पाणी

बनवण्याची पद्धत

प्रथम गॅस ऑन करुन त्यावर कुकर ठेवा. मग त्यात थोडं तेल टाका आणि बटर तसेच आलं-लसूण पेस्ट टाकून चांगल परतून घ्या. नंतर त्यात लांब चिरलेला कांदा आणि बासमती तांदूळ टाका. हे सर्व मिश्रण एकत्रितपणे चांगले मिक्स करुन घ्या. नंतर या मिश्रणात गव्हाच्या शेवया आणि चिरलेला टोमॅटो, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची, मक्याचे दाणे अॅड करा.

कुकरमध्ये टाकलेल्या या सर्व मिश्रणाला नीट एकत्र मिक्स करुन घ्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाका. नंतर पुन्हा सर्व मिश्रण मिक्स करुन त्यावर चीज, मीठ आणि काळी मिरी पावडर टाका. या सर्व मिश्रणाला एकत्रितपणे एकजीव करुन कुकर झाकणाने बंद करा. त्यानंतर कुकरच्या तीन शिट्टया झाल्यावर गॅस बंद करा. नंतर कुकर थोडावेळ थंड होऊ द्या. कुकरचे झाकण काढून तुम्ही चीज राइसला रायतासोबत सर्व्ह करु शकता.

चीज राईस इतका स्वादिष्ट आणि चविष्ट लागतो की लहान मुलं देखील या भातावर ताव मारतील. शिवाय यामध्ये विविध पौष्टीक भाज्या मिक्स केल्याने आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. काही लहान मुलांना फळभाज्या आवडत नाहीत. भाजी न खाल्ल्याने यातील प्रोटीन त्यांना मिळत नाही. आता मुलांनी सर्व भाज्या खाव्यात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने युनीक चीज राईस बनवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT