Shreya Maskar
घरी ओव्हन नसले तरी तुम्ही चटपटीत, मऊ चीज गार्लिक ब्रेड बनवू शकता. सिंपल रेसिपी जाणून घ्या.
चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मैदा, साखर, यीस्ट, कॉर्न, तेल, चीज, मीठ, ओरेगॅनो, लसूण, चिली फ्लेक्स, लोणी इत्यादी साहित्य लागते.
चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम कोमट पाण्यात साखर विरघळवून त्यात यीस्ट टाकून बाजूला ठेवा.
एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ, लसूण, ओरेगॅनो घालून मिक्स करा.
आता हे मिश्रण मैद्यात घालून मऊ पीठ मळून त्यावर मीठ घालून काही वेळ पीठ बाजूला ठेवून द्या.
थोड्या वेळाने पिठाला तेलाने ग्रीस करून त्यावर कोरडे पीठ शिंपडून तुमच्या आवडीचा आकार द्या.
आता त्यावर चीज आणि उकडलेले कॉर्न टाका.
काठाला तेल लावून दुसरी बाजू दुमडून घ्या. याला भरपूर बटर लावा.
एका पॅनमध्ये मीठ टाकून त्यात एक भांड ठेवून त्यावर गार्लिक ब्रेड बेकिंग ट्रे ठेवून १५ ते २० मिनिटे हे छान बेक करून घ्या.
अशाप्रकारे ओव्हनचा वापर न करता खमंग चीज गार्लिक ब्रेड तयार झाला.