Silent heart attack warning and symptoms google
लाईफस्टाईल

Silent heart attack signs: सायलेंट हार्ट अटॅक... कधीही समजून येत नाहीत असे ७ संकेत, वाचा सविस्तर

prevent silent heart attack naturally: हृदयविकाराचा झटका अनेकदा अचानक होतो असे मानले जाते. पण काही वेळा तो सायलेंट हार्ट अटॅक स्वरूपात दिसतो, ज्यामध्ये लक्षणे सौम्य असतात आणि दुर्लक्षित केली जातात.

Surabhi Jayashree Jagdish

अनेक हार्ट अटॅक येणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची लक्षणं जाणवत नाहीत. याला सायलेंट हार्ट अटॅक किंवा Silent Myocardial Infarction म्हणतात. याचाच अर्थ कोणत्याही वेदनेशिवाय हृदय विकाराचा झटका येतो. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही छोटी लक्षणं दिसून येतात.

सायलेंट हार्ट अटॅक हा स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक दिसून येतो. याचं कारण म्हणजे याची लक्षणं फार छोटी असून स्त्रिया अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांमध्ये श्वास घेण्यास त्रास, मळमळ किंवा थकवा यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

सतत आणि अनपेक्षित थकवा

नेहमीच्या कामांदरम्यान सतत थकवा जाणवणं हे शांत हार्ट अटॅकचं सुरुवातीचे लक्षण असू शकतं. हृदय रक्त योग्य पद्धतीने पंप करू शकत नसल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही व्यक्तीला थकवा जाणवतो.

छातीत अस्वस्थता जाणवणं

सामान्य हार्ट अटॅक आला की तीव्र वेदना जाणवतात, पण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीत सौम्य अस्वस्थता, दडपण जाणवतं.

श्वास घेण्यास त्रास

अगदी कमी शारीरिक श्रमांदरम्यान किंवा विश्रांतीत असतानाही श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर ते हृदय नीट रक्त पंप करू शकत नसल्याचे लक्षण असू शकते.

मळमळ किंवा अपचन

अचानक मळमळ, उलटी किंवा पोट भरल्यासारखं वाटणं हे सायलेंट हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतं. ही लक्षणं अनेकदा पचनसंस्थेच्या समस्यांशी जोडली जातात.

भोवळ येणं

अचानक उभं राहिल्यावर डोकं हलकं होणं किंवा भोवळ येणं हे मेंदूकडे रक्तपुरवठा कमी झाल्याचं लक्षण असू शकतं. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये

थंड घाम येणं

कोणतही शारिरीक काम न करता तुम्हाला घाम येत असेल तर ते सायलेंट हार्ट अटॅकचं लक्षण असतं. जर हा घाम थंड असेल तर तु्म्ही अधिक सावध पाहिजे.

वरच्या शरीरात वेदना

जबडा, मान, पाठ किंवा हातांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं हे सायलेंट हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. ही वेदना अचानक येते किंवा सौम्य असते, त्यामुळे त्याला मसल पेन समजलं जातं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

White Hair Care: कमी वयातच केस पांढरे होऊ लागले? मग करा 'हा' घरगुती उपाय, महिन्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT