How to Know If Someone is Hacking Your Phone Saam Tv
लाईफस्टाईल

How Hackers Hack Phone: तुमचा फोन हॅक झालाय का? 'ही' आहेत मोबाईल हॅकिंगची लक्षणे, जाणून घ्या उपाय

How to Know If Someone is Hacking Your Phone: जर आपला फोन हॅक झाला तर काय करायचं? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहेत.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Phone Hacking Signs: स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोनशिवाय आपण आयुष्याची कल्पनाही करवत नाही. खरेदी, ऑनलाईन व्यवहार, शिक्षण, बॅंकेचे व्यवहार अशी असंख्य कामं आपण आपल्या मोबाईलवरच करतो. मात्र, जर आपला स्मार्टफोन हॅक झाला तर आपल्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

शिवाय आर्थिक नुकसानही संभवते. अशात आपला फोन हॅक झालाय का हे कसं ओळखायचं? फोन हॅक झाल्यावर कोणते संकेत मिळतात? आणि जर आपला फोन हॅक झाला तर काय करायचं? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहेत. (How to know if your phone is hacked)

हॅकिंग सॉफ्टवेअर

सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा फोन हॅक (Hacking) करणे ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. यासाठी हॅकर्स एकतर तुमच्या नकळत तुमच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर टाकतात किंवा कोणताही फिशिंग मेल वापरतात. यासाठी हॅकर्स दोन प्रकारचे सॉफ्टवेअर वापरतात. एक अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे ट्रोजन आणि दुसरा मार्ग म्हणजे की-लॉगिंग.

की लॉगिंगबद्दल बोलायचे झाले तर ते, स्टॉकरसारखे काम करते. तुमच्या फोनमध्ये (Smartphone) असलेल्या या प्रकारच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही काय टाइप करत आहात, फोन स्क्रीनवर तुम्ही कुठे टॅप करत आहात आणि फोनवर तुम्ही कोणाशी बोलत आहात हे हॅकर्सना कळते. (Latest Marathi News)

फोन हॅक झाल्याचे 'हे' आहेत संकेत

तुमचा फोन कोणीतरी हॅक केला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तो सहज तपासू शकता. याबाबत, त्याचे काही संकेत (सिग्नल किंवा लक्षणं) तुमच्या फोनमध्ये दिसतील.

१) फोन हॅक झाल्यावर तुमच्या फोनची बॅटरी झपाट्याने संपते.

२) तुमचा स्मार्टफोन हळू काम करेल आणि लवकर गरम होईल.

३) हँडसेटमधील अनेक अॅप्स अचानक बंद होतील किंवा फोन बंद होऊन स्वतःच चालू होईल.

४) स्मार्टफोनमध्ये तुम्ही वापरत असलेल्या तुमच्या गरजेपेक्षा जास्त डेटा खर्च होईल. यामध्ये तुम्हाला अतिरिक्त एसएमएस आणि इतर शुल्क देखील वाढलेलं दिसेल.

लोक कोणत्या मार्गाने अडकतात?

१) फोन हॅकिंगचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे फिशिंग हल्ला. त्याच्या नावावरूनच या प्रकारच्या हल्ल्याचा अंदाज येऊ शकतो. ज्याप्रमाणे मासे आमिषाने अडकतात, त्याचप्रमाणे हॅकर्स फिशिंग मेल, ऑफर किंवा एसएमएसद्वारे लोकांना अडकवतात. हॅकर्स मेल किंवा मेसेजमध्ये अज्ञात लिंक पाठवतात आणि तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो.

२) दुसरा मार्ग म्हणजे ब्लूटूथ हॅकिंग. हॅकर्स अशा उपकरणांचा वापर करतात, जे असुरक्षित उपकरणांच्या शोधात असतात. जर तुमच्या फोनचे ब्लूटूथ नेहमी चालू असेल तर हॅकर्स तुमचा फोन 30 फूट अंतरावरून हॅक करू शकतात.

३) सिम कार्ड स्वॅपिंग ही देखील एक लोकप्रिय हॅकिंग पद्धत आहे. 2019 मध्ये अगदी ट्विटरच्या सीईओचे सिमकार्ड स्वॅपिंगद्वारे हॅक करण्यात आले होते. या प्रकारच्या स्वॅपिंगसाठी, हॅकर्स तुमच्या सिम ऑपरेटरला तुमच्या बेसवर कॉल करतात आणि सिम बदलण्याची मागणी करतात. हॅकरला नवीन सिम कार्ड मिळताच तुमचे मूळ सिम कार्ड काम करणे बंद करते.

तुम्ही स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकता?

जर तुम्हाला इंटरनेटच्या दुनियेत स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुमच्यासाठी सक्रिय आणि सतर्क राहणे खूप महत्त्वाचे आहे. असं नाही की फक्त एक सेटिंग करून तुम्ही स्वतःला कायमचे सुरक्षित करू शकता. तुमची कोणतीही चूक होऊ नये आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकू नये, यासाठी तुम्हाला असा सतत सतर्क राहून मोबाईलवर नीट लक्ष द्यावं लागतं.

१) तुमचा फोन नेहमी अपडेट करत रहा. केवळ फोनच नाही तर डिव्हाइसमध्ये वापरल्या जाणारे अॅप्स देखील अपडेट करत रहा, जेणेकरून हॅकर्सना कोणतीही पळवाट मिळणार नाही.

२) तुमची ऑनलाइन जीवनशैली सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी मजबूत आणि यूनिक पासवर्ड वापरा.

३) सार्वजनिक वायफाय, चार्जिंग स्टेशन वापरणे टाळा.

४) कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, जरी तो मेसेज तुमच्या ओळखीच्या कोणीतरी पाठवला असेल तरीही क्लिक करु नका.

५) गरज नसताना ब्लूटूथ आणि वायफाय बंद ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्याकांडातील मुख्य आरोपीच्या परदेशातून मुसक्या आवळल्या

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

SCROLL FOR NEXT