Diwali 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Diwali Swapna Shastra: दिवाळीत जर 'ही' 3 स्वप्न दिसली तर समजा तुम्ही होणार श्रीमंत; देवी लक्ष्मी देत असते संकेत

Diwali dream meaning wealth: ज्योतिषशास्त्र आणि स्वप्नशास्त्रनुसार, जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्या भक्तावर प्रसन्न होते, तेव्हा ती काही खास स्वप्नांद्वारे व्यक्तीला शुभ संकेत देते.

Surabhi Jayashree Jagdish

सनातन धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. या पवित्र सणावर देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. यावेळी आणि घरामध्ये धन, आनंद आणि समृद्धी यांचं आगमन व्हावं अशी प्रार्थना केली जाते. यंदा दिवाळी २० ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल.

दिवाळीच्या या सणाच्या काळात तुम्हाला काही खास प्रकारची स्वप्न दिसत असतील, तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करण्याचा संकेत देत आहेत. स्वप्नशास्त्रानुसार दिवाळीच्या दिवसांत दिसणाऱ्या स्वप्नांना विशेष महत्त्व असते. स्वस्तिक, ॐ, मंदिर यांसारखी चिन्हं स्वप्नात दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. जाणून घेऊया दिवाळीच्या काळात दिसणाऱ्या काही स्वप्नांचे अर्थ काय असतात.

स्वप्नात स्वस्तिक, ॐ किंवा शंख दिसणं

स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नामध्ये स्वस्तिकाचे चिन्ह रेखाटलेले दिसले किंवा ॐ अथवा शंख दिसला, तर हे अत्यंत शुभ संकेत असतात. दिवाळीपूर्वी किंवा दिवाळीच्या रात्री असं स्वप्न दिसल्यास समजावं की देवी लक्ष्मी तुमच्याकडे जीवनातील मोठे संकेत पाठवत आहेत. लवकरच तुमच्या घरी लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे, असा या स्वप्नाचा अर्थ असतो.

स्वप्नात मंदिर दिसणं

दिवाळीपूर्वी जर स्वप्नात एखादं मंदिर दिसलं आणि तुम्ही त्या मंदिरात प्रवेश करत आहात असं जाणवलं, तर हा स्वप्न संकेत देतो की, तुमच्या दीर्घकाळाच्या मेहनतीला आता योग्य फल मिळणार आहे. राजकारण क्षेत्रात कार्यरत असाल तर यशाचे दरवाजे उघडणार आहेत. अध्यात्मिक दृष्ट्या तुमचा विकास होणार आहे.

स्वप्नात दिवा किंवा अखंड ज्योती दिसणं

स्वप्नशास्त्रानुसार, जर स्वप्नात अखंड ज्योती किंवा तेजाने लुकलुकणारा दिवा दिसला, तर हे अत्यंत मंगलसूचक स्वप्न असतं. याचा अर्थ तुमचं भाग्य उजळणार आहे. देवी लक्ष्मी तुम्हाला हा संदेश देत असतात की, त्यांची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. या दिवाळीपासून तुमच्या जीवनात स्थिरता निर्माण होईल.

दिवाळीचा सण हा प्रकाशाचा आणि आशेचा सण आहे. या काळात येणारी स्वप्नं अनेकदा आपल्या भविष्याचे संकेत देतात. त्यामुळे अशी शुभ स्वप्नं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्यांचा सकारात्मक अर्थ समजून मनापासून आभार मानावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर टाळल्या पाहिजेत?

Maharashtra Live News Update: मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही; रुपाली ठोंबरे पाटील

Banjara Community : बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक; एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

SCROLL FOR NEXT