Heart Veins Blockage Signs saam tv
लाईफस्टाईल

Heart Blockage Signs: हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यावर शरीर देतं 'हे' संकेत; सामान्य समजून ९९% लोकं करतात दुर्लक्ष

Heart Veins Blockage Signs: जेव्हा हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. अशा परिस्थितीत, हृदयाच्या स्नायूंना रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात अनेक अवयव असून प्रत्येकाचं काम हे वेगवेगळं असतं. परंतु यातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय. हृदय हे दिवसरात्र सतत कार्यरत राहून शरीराच्या सर्व भागांना रक्त आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य निरोगी राखणं खूप गरजेचं आहे.

जर कोणत्याही कारणास्तव हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आला तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. डॉक्टरांच्या मते, जेव्हा हृदयाच्या नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. अशा परिस्थितीत, हृदयाच्या स्नायूंना रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. परिणामी हृदयविकाराचा झटका येतो. दरम्यान हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर शरीर कोणते संकेत देतं ते पाहूयात.

हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याचे संकेत

सतत अपचन

डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला छातीत दुखण्यासोबत वारंवार उलट्या होण्याचा त्रास जाणवत असेल तर ते हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होण्याचं लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीत, डॉक्टरांशी संपर्क साधण्यास उशीर करू नका.

पायांमध्ये वेदना होणं

जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वेदना आणि सतत सूज जाणवत असेल तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका. खरंतर, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळ्यामुळे शरीराच्या खालच्या भागात द्रव जमा होण्याचा धोका असतो. यावेळी गुडघे आणि काल्फमध्ये वेदनांसह सूज येऊ शकते.

चक्कर येणं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला काहीही केल्यानंतर लगेच चक्कर येण्याचा त्रास होत असेल किंवा खूप थकवा जाणवत असेल तर हे हृदयाच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होण्याचं लक्षण असू शकतं. यामध्ये हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त काम करावं लागतं. ज्यामुळे आपल्याला चक्कर येते.

छातीत वेदना

हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा आल्यास छातीत वेदना होणं हे पहिले आणि सर्वात मोठं लक्षण आहे. जर तुमच्यासोबत कधी असं घडले तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. त्याऐवजी, रुग्णाला ताबडतोब तुमच्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरकडे घेऊन जा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT