आजकाल सर्वजण स्वतः च्या आरोग्याबाबत चिंतेत असतात. बदलते वातावरण, राहाणीमानातील बदल याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यातच आजकाल सर्व वयोगटामध्ये हृदयविकाराचा धोका वाढताना दिसत आहे. यात आपण कोणत्याही लक्षणाला हदयविकाराची लक्षणे समजतो आणि पॅनिक होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत.
हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य लक्षणे म्हणजे अॅसिडिटी आणि गॅसेसचा त्रास असा लोकांचा गैरसमज असतो. यावर लोक घरगुती उपाय करतात. रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कधी कधी त्यांच्या जीवावरही बेतू शकते. हृदयाशी संबंधित आजारांमुळे आतापर्यंत दरवर्षी सुमारे १८ दक्षलक्ष लोक मृत्यूस बळी पडली आहेत. जे काही अन्नपदार्थ खाता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. तुमच्या छातीत दुखण्याचा संबंधही तुमच्या जेवणाशी असतो.
अॅसिडीटी आणि हृदयविकाराचा धोका सारखाच वाटतो
अॅसिडिटीमुळे हृदयात जळजळ झाल्यासारखी वाटते आणि हृदयविकाराचा झटका येतो. या दोघांची लक्षणे जवळपास सारखीच असतात. त्यांची लक्षणे न टाळण्याजोगी असतात. त्यामुळे यात फरक ओळखणे फार कठीण होते. अॅसिडीटीमध्ये छातीत जळजळ जाणवते. विशेषत, पोटाच्या वरच्या भागात ही जळजळ जास्त प्रमाणात होते. अॅसिडिटीमुळे तोंडात आंबट आणि कडू चव येते तर उलट्याही होतात.
हृदयविकाराच्या झटक्यात तुमच्या छातीत दुखते. तसेच छातीचा दाब हा उच्च होतो. हृदयविकाराच्या झटक्याने वेदना छातीपासून मान,जबडा आणि पाठीपर्यंत पसरते. पोटात दुखणे, धाप लागणे, घाम येणे आणि चक्कर येणे ही हृदयविकाराची लक्षणे आहेत. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने हा त्रास होतो. शारिरिक हालचालीनंतर छातीत दुखण्यास सुरूवात होते.
इतर छातीत दुखणे आणि हृदयविकाराचे झटके
अॅसिडिटी व्यतिरिक्त छातीत दुखण्याचे इतर प्रकार आहेत. अन्ननलीकेत स्नायूंच्या क्रियेने वेदना होण्याची शक्यता असते. ही वेदना कदाचित हृदयविकाराच्या झटक्यासारखी वाटेल. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना ओटीपोटात त्रास होऊन हृदयविकाराचा झटका आल्यासारखे वाटेल.
शारीरिक काम किंवा तणावानंतर जर तुमच्या छातीत दुखत असेल तर ताबडतोब उपचार घ्या. छातीत दुखण्याचं प्रमाण वाढत असेल अन् ते तुमच्या हात, तोंड आणि पाठीकडे सरकत असल्याचे जाणवल्यास लगेच डॉक्टरकडे जाऊन मदत घ्या. त्रास होण्याआधी तुम्ही जेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.