लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग करण्यासाठी असलेले YouTube हे जगप्रसिद्ध अॅप्सपैकी एक आहे. अनेक वेळा जेव्हा तुम्हाला चांगल्या दर्जाचे व्हिडिओ पाहायचे असतात, तेव्हा तुमचे इंटरनेट कनेक्शन सपोर्ट करत नाही.
कमी डेटा स्पीडमुळे, तुम्ही व्हिडिओ (Video) व्यवस्थित पाहू शकत नाही. यासाठी, YouTube तुम्हाला अॅपमध्ये व्हिडिओ सेव्ह करण्याची परवानगी देतो जेणेकरून तुम्ही ते नंतरही पाहू शकता. त्याच वेळी, इच्छित असल्यास, तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये HD व्हिडिओ डाउनलोड करू शकता.
60 सेकंदांपेक्षा कमी वेळेत YouTube व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या तीन पद्धती वापरून पाहा -
पहिली पद्धत :
तुम्हालाही व्हिडिओ ऑफलाइन पाहायचा आहे तर तुम्ही यूट्यूब अॅपमध्येच डाउनलोड करू शकता. यासाठी यूट्यूबवर व्हिडिओ चालू केल्यावर त्याच्या खाली तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय दिसेल. तुम्हाला फक्त त्या डाउनलोड बटणावर टॅप करावे लागेल आणि Videoची डाउनलोड Quality सिलेक्ट करा मग ते डाउनलोड होण्यास सुरूवात होईल.
डाउनलोड केलेला व्हिडिओ कुठे मिळवायचा :
कोणताही व्हिडिओ डाउनलोड (Download) केला तर तो YouTube च्या लायब्ररीमध्ये पाहता येईल. त्यानंतर सर्वात खाली असलेल्या तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. तेथे गेल्यावर डाउनलोड पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा आणि तुमचा व्हिडिओ सेव्ह होईल आता तो तुम्ही केव्हाही पाहू शकाल.
दुसरी पद्धत :
ही पद्धत त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्यांच्या फोनच्या स्टोरेजमध्ये YouTube व्हिडिओ डाउनलोड करायचे आहेत. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला असलेला YouTube व्हिडिओ चालू करून त्याचा वरती असलेला URL कॉपा करावा लागेल आणि त्यानंतर त्या कॉपी केलेल्या URL मध्ये तुम्हाला ss लिहावे लागेल. त्यानंतर en.savefrom.net ही वेबसाइट उघडेल. यानंतर रिझोल्यूशन निवडा आणि डाउनलोड वर टॅप करा.
तिसरी पद्धत :
वरील दोन पद्धतींव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही Google वर काही शोधता तेव्हा तुम्हाला इतर अनेक पद्धती देखील सापडतात ज्याद्वारे तुम्ही YouTube व्हिडिओ डाउनलोड करू शकता. फ्री यूट्यूब (Youtube) डाऊनलोड, एनी व्हिडीओ कन्व्हर्टर फ्री आणि 4के व्हिडिओ डाउनलोडर इत्यादी अनेक वेबसाइट्सचा समावेश आहे. तुम्ही यापैकी कोणतीही पद्धत वापरून डाउनलोड करू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.