Side Effects Of Using Mobile Phone Saam Tv
लाईफस्टाईल

Side Effects Of Using Mobile Phone : रात्री उशिरापर्यंत फोन स्क्रोल करताय? झोप येत नाही, होऊ शकतो गंभीर आजार

Eye Care Tips : रात्री उशिरा पर्यंत मोबाईल पाहाण्याची सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करु शकते.

कोमल दामुद्रे

Screen Time Side Effects :

मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना फोन चाळायची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भागच झाला आहे.

दिवसभर फोन वापरुनही अनेकजण रात्री उशिरापर्यंत फोनवर स्क्रोल करत राहातात. कधी रिल्स तर कधी वेबसीरिज पाहाण्यात वेळ कधी निघून जातो समजत नाही. परंतु, रात्री उशिरा पर्यंत मोबाईल पाहाण्याची सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करु शकते. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. स्क्रीन टाइमचा आरोग्यावर होणारा परिणाम

  • स्क्रीनवरुन (Screen) येणारा निळाप्रकाश डोळ्यांसाठी अधिक हानिकारक असतो. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

  • झोप व्यवस्थित पूर्ण न झाल्याने दिवसभर आपल्याला आळस आणि डोळ्यांवर (Eye) येणाऱ्या ताणामुळे दिनचर्या खराब होते.

  • स्क्रीन टाइम वाढल्यामुळे तुम्ही चिंता आणि नैराश्याला बळी पडू शकतात.

  • स्क्रीन टाइमच्या अतिवापरामुळे तुम्हाला एकटेपण अधिक जाणवते. सध्या Fear of Missing Out हा देखील एक ट्रेंड बनला आहे.

  • खूप वेळ फोन (Phone) पाहिल्यानंतर व एकाच ठिकाणी बसल्यानंतर हात आणि खांद्याच्या स्नायूंवर परिणाम होतो.

2. स्क्रोलिंगला कसे थांबवाल?

  • मोबाइल वापरण्यासाठी वेळ मर्यादा सेट करा. रात्री १० नंतर मोबाइल फोन बंद करा. यामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, स्क्रीन टाइम कमी होईल.

  • न वापरणारे किंवा गरजेचे नसणारे अॅप्स फोनमधून डिलीट करा. तसेच स्लीप मोड ऑन करा. ज्यामुळे तुम्हाला लवकर झोपण्याची सवय लागेल.

  • स्क्रोल करताना फोनची लाइट मंद स्वरुपात ठेवा ज्यामुळे डोळ्यांवर कमी ताण येईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT