Shukra Gochar 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Gochar 2023 : शुक्र ग्रहाचे कन्या राशीत संक्रमण! पुढील महिनाभर या राशी लखपती, जोडीदाराशी वाद टाळा

Shukra in Kundali : शुक्र ग्रहाला भौतिक सुखाचा कारक मानले जाते. ३ नोव्हेंबरला शुक्र ग्रहाचे कन्या राशीत संक्रमण झाले आहे.

कोमल दामुद्रे

Shukra Gochar In Kanya 2023 :

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. त्यामुळे प्रत्येक राशीवर त्याचा शुभ अशुभ परिणाम पाहायला मिळतात. शुक्र ग्रह हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो.

३ नोव्हेंबरला शुक्र ग्रहाचे कन्या राशीत संक्रमण झाले आहे. त्यामुळे अनेक राशींना लाभ होईल. शुक्र खराब असल्यास त्वचेसंबधित समस्या निर्माण होतील. कन्या राशीत विराजमान झालेल्या शुक्राचा १२ राशींवर कसा परिणाम होईल हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मेष

आरोग्याची (Health) काळजी घ्या. भावडांची साथ मिळेल. कुटुंबाची प्रगती होईल. अपेक्षित लाभ मिळतील.

2. वृषभ

विद्यार्थांना अधिक लाभ होईल. बुद्धीमत्तेमध्ये वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कामात लक्ष द्या.

3. मिथुन

घर, जमीन, वाहनांचे सुख मिळेल. आईसोबत वाद टाळा. विवाहाच्या संधी तयार होतील. इच्छुकांचे विवाह जुळतील. नवीन वाहन खरेदी (Shopping) करण्याची संधी मिळेल.

4. कर्क

कामात घवघवीत यश (Success) मिळेल. भावा-बहिणीसोबतचे संबंध चांगले होतील. पुरेशी झोप घ्या. मेहनतीनुसार फळ मिळेल. जोडीदाराशी भांडण होईल.

5. सिंह

आर्थिक स्थितीपूर्वीपेक्षा उत्तम होईल. कामाच्या नवीन संधी निर्माण होतील. सांसारिक सुखांची प्राप्ती होईल. नवीन ठिकांणी गुंतवणूक कराल.

6. कन्या

जोडीदाराचे आणि तुमचे आरोग्य चांगले राहिल. दिवाळीत बोनस मिळेल. आर्थिक लाभ घडतील. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल.

7. तुळ

इतरांकडून मदत मिळणे कठीण होईल. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातील परिस्थिती चांगली होईल. कामात अधिक प्रयत्न करावे लागतील.

8. वृश्चिक

सौंदर्यात भर पडेल. स्वभावात बदल करा. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराच्या सल्ल्याने काम केल्यास फायदा होईल. उत्पन्न वाढेल. नव्या नोकरीच्या संधी मिळतील.

9. धनु

करिअरमध्ये यश मिळेल. कामात वडिलांचे सहकार्य लाभेल. प्रगतीच्या अनेक नव्या संधी मिळतील. यशस्वी व्हाल. लवकरच जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.

10. मकर

भाग्यात सुधारणा होईल. मेहनतीच्या जोरावर पैसा मिळेल. मेहनत केल्यास यश साध्य होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत आणि चांगली होईल.

11. कुंभ

आरोग्य उत्तम राहिल. जोडीदारासोबत वादविवाद मिटतील. शत्रूंचा पराभव कराल. आयुष्य मार्गी लागेल. पैसे कमी खर्च कराल.

12. मीन

स्वभावात सुधारणा करा. जोडीदाराशी संबंध चांगले राहातील. प्रकृती चांगली राहिल. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT