Shukra Chadra Yuti In Kark Rashi  Saam Tv
लाईफस्टाईल

Shukra Chandra Yuti In Kark Rashi : शुक्र-चंद्र युतीमुळे होतील लाभ ! या 3 राशींना मिळणार यश, वाढेल बँक-बॅलेन्स

Kalatmak Yog : काहींना यश मिळेल तर काहींच्या आयुष्यात मोठी उलाढाल पाहायला मिळेल.

कोमल दामुद्रे

Shukra Chandra Yuti : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी त्याची रास बदलून त्याचे शुभ व अशुभ परिणाम देत असते. सध्या चंद्र व शुक्र हे दोन्ही ग्रहांनी कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे काहींना यश मिळेल तर काहींच्या आयुष्यात मोठी उलाढाल पाहायला मिळेल.

काल २० जून रोजी चंद्र व शुक्र ग्रहांने कर्क राशीत प्रवेश केला आहे त्यामुळे कलात्मक योग तयार झाला आहे. पाहायला गेले तर शुक्र आधीच कर्क राशीत आहे. शुक्र व चंद्राच्या संयोगाने तयार होणारा हा कलात्मक योग सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकेल. हा कलात्मक योग 3 राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. या लोकांना आर्थिक (Money) लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया शुक्र-चंद्र युती कोणत्या लोकांना मोठा लाभ देईल याबद्दल

1. मेष :

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक आहे. चंद्र आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार होणारा कलात्मक योग मेष राशीच्या लोकांना धनाचा लाभ होईल. नवीन वाहन खरेदी करु शकता. नवीन संपर्क तयार होतील, ज्यामुळे तुम्हाला बरेच फायदे (Benefits) होतील. बेरोजगारांना नोकरी (Job) मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. उत्पन्न चांगले राहील.

2. मिथुन:

चंद्र-शुक्र युती मिथुन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. नोकरी-व्यवसायात लाभ होईल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील, ज्यामुळे तुम्ही थकून जाल. पण हे काम तुम्हाला भविष्यात लाभ देईल, नवीन ओळखी निर्माण होईल. आर्थिक लाभ होतील. तुमची लोकप्रियता वाढेल. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.

3. वृश्चिक :

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा कलात्मक योग खूप फलदायी ठरेल. भाग्य तुमच्या सोबत राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील, उलट कामे लवकर होतील. तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य मिळू शकते. काही लोकांचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT