Shravan Special  SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan Special : श्रावणात शंकराला वाहणारे बेलपत्र त्वचेच्या तक्रारींवर हमखास गुणकारी; देईल मिनिटांत मुलायम, ग्लोइंग स्किन

Bael Patra Benefits : श्रावणात महादेवाला अर्पण करणारे बेलपत्र चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील पिंपल्स कमी होऊन त्वचा मुलायम बनते. बेल पत्राचा फेसपॅक कसा बनवावा जाणून घ्या.

Shreya Maskar

श्रावण म्हणजे सणासुदीचा महिना. श्रावण सोमवारी अनेक लोक व्रत करून महादेवाची पूजा करतात. शंकराला बेलपत्र अर्पण करून दुधाचा अभिषेक करतात. बेलपत्र आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन ए, प्रोटीन, कॅल्शियम, बिटा कँरोटीन इत्यादी पोषक घटक आहेत. जे निर्जीव त्वचा मुलायम करण्यास मदत करते. बेल पत्रामधील पोषक घटक त्वचा सुधारण्यास तसेच चेहऱ्याची चमक आणण्यास मदत करते. बेलपत्र पाण्यात उकळून चेहऱ्यावर काही काळ लावून ठेवा यामुळे चेहऱ्याला चमक येते.

त्वचेचा संसर्ग दूर

आपण सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रोडक्ट आणि मेकअप चेहऱ्यावर लावतो. ज्यामुळे आपले त्वचेचे खराब होते आणि अनेक वेळा त्वचेला संसर्ग देखील होतो. संसर्गामुळे त्वचेवर खाज येते आणि जळजळ होते. अशा वेळी बेल पत्राची पेस्ट लावणे फायदेशीर राहते. यामुळे चेहऱ्यावर थंडावा येतो आणि जळजळ कमी होते. कारण बेलपत्र मध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे संसर्ग रोखण्यास मदत करतात.

काळे डाग

सतत बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर टॉनिंग होते. हे टॉनिंग दूर करण्यासाठी बेलपत्र रामबाण उपाय आहे. तसेच चेहऱ्यावर पिपंल्समुळे येणारे काळे डाग दूर होतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे दूर करण्यासाठी बेल पत्राची पेस्ट खूप उपयोगात येते.

सुरकुत्या दूर

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बेलपत्र उपयोगी पडते. बेलपत्र त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करते. त्वचेचे पिगमेंटेशन कमी करून त्वचा मऊ आणि ग्लोइंग करते. तुमच्या अंगाला दुर्गंधी येत असेल तर बेल पत्राचा लेप शरीराला लावून ठेवा आणि कालांतराने छान अंघोळ करा.

बेलपत्र फेसपॅक

साहित्य

  • बेलपत्र

  • गुलाबपाणी

  • केशर

  • मुलतानी माती

  • कोरफड

कृती

बेलपत्राचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम थोडे पाणी घालून बेलपत्र मिक्सरला वाटून घ्या. आता ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून त्यात गुलाबपाणी, गुलाबपाणी, केशर, मुलतानी माती आणि कोरफड गर टाकून छान फेसपॅक मिक्स करून घ्या. चेहरा स्वच्छ धुवा आणि हा फेसपॅक चेहऱ्याला १५ ते २० मिनिटे लावा. फेसपॅक सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फ चोळा. हा फेसपॅक आठवड्यातून किमान दोन वेळा तरी लावा. चेहऱ्याचे आरोग्य सुधारेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT