ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्यात प्रत्येक शिवमंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले जाते, कारण या पूजेचे विशेष महत्त्व असते.
शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी अपर्ण केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.
मात्र आपल्यापैंकी अनेकांना माहिती नाही की शिवलिंगावर प्रथम पाणी का बेलपत्र अपर्ण करावे?
पूजेसाठी गेल्यानंतर पहिल्यांदा शिवलिंगावर पाणी अपर्ण करावे.
पाणी अपर्ण केल्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र ठेवावे. बेलपत्र शंकर भगवान यांना खूप प्रिय आहे.
श्रावणी सोमवारी पूजा करताना शिवलिंगावर बेलपत्र अपर्ण करताना 'ओम नम:शिवाय' या मंत्राचा जप करावा.
कधीही पूजा करताना शिवलिंगावर आर्ध किंवा तुटलेले बेलपत्र अपर्ण करु नये.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.