Vastu Tips OF Mirror In Dinning Table Saam TV
लाईफस्टाईल

डायनिंग टेबलच्या समोर आरसा लावावा की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील शुभ-अशुभ संकेत!

Vastu Tips OF Mirror In Dinning Table: डायनिंग टेबलच्या समोर आरसा लावावा की नाही? वास्तुशास्त्रानुसार डायनिंग रूम आणि किचनमध्ये आरसा लावण्याचे शुभ-अशुभ संकेत आणि योग्य दिशा सविस्तर जाणून घ्या.

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूंविषयी व त्यांच्या जागेविषयी नियम सांगितले आहेत. यानुसार, घरात आरसा लावण्याचे देखील काही नियम आहेत. घरात डायनिंगटेबलच्या समोर आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात सुख- समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार, घरात आरसा कुठे कुठे लावावा? आणि त्याचे शुभ संकेत आणि योग्य दिशा कोणती ते सविस्तरपणे पाहूया.

किचनमध्ये आरसा लावावा की नाही?

अनेकजण किचनमध्ये आरसा लावतात. परंतु, वास्तुशास्त्रात आरसा केवळ सजावटीसाठी नाही तर सुख- समृद्धीसाठी प्रतीक मानले जाते. किचनमध्ये आरसा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. किचनमध्ये आरसा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.

डायनिंग टेबलसमोर आरसा लावा

वास्तुशास्त्रानुसार, डायनिंग टेबलच्या समोर मोठा आरसा लावणे शुभ मानले जाते. जेजेव्हा कुटुंबातील सदस्य डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला बसतात, तेव्हा आरशामध्ये जेवणाच्या ताटांचे आणि अन्नाचे प्रतिबिंब दिसते. वास्तुशास्त्रात, अन्नाचे प्रतिबिंब दिसणे हे सुख- समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

किचनमध्ये पश्चिम दिशेला आरसा लावावा की नाही?

जर तुमचे किचन पश्चिम दिशेला असेल तर घरात किचनमध्ये आरसा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये पश्चिम आणि पूर्वेकडे आरसा लावणं फायदेशीर मानले जाते. या दिशेला आरसा लावल्याने वास्तुसंबंधित समस्या दूर होतात.

आरसा लावण्याचे महत्वाचे नियम

किचनमध्ये आरसा लावताना योग्य दिशा निवडणे महत्वाचे आहे. किचनमध्ये आरसा लावताना तो योग्य दिशेला लावा जेणेकरून अन्नाचे प्रतिबिंब दिसेल. किचमध्ये लावलेला आरसा स्वच्छ आणि चांगला असावा. तुटलेला आरसा किचनमध्ये चुकूनही लावू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एक कोटींचे कर्ज दिले, तीन कोटींची मागणी! व्याजाच्या वसुलीसाठी जीवे मारण्याची धमकी

सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी शिंदेंसेनेचे पाटील

शिवसेना सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात! बाळासाहेब पाटील प्रकरणाचा दाखला, सर्वोच्च न्यायालयात आज काय घडलं? वाचा सविस्तर

Government Job : सरकारी नोकरीसाठी २ मुलांची अट संपली! पण सरकारचा नवा नियम, जाणून घ्या महत्त्वाची अट

Voter List: मतदार यादीमध्ये अनियमितता, २ निवडणूक अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन; सरकारची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT