Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाटी शरीराची स्वच्छ करणे महत्वाचे आहे तितकेच तोंडाची स्वच्छता देखील महत्वाची आहे.
सकाळी उठल्यानंतर आपण न चुकता दात घासतो पण जिभेची स्वच्छता करायला विसरतो किंवा दुर्लक्ष करतो.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का? दातांप्रमाणेच जीभ स्वच्छ करणे देखील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर रोज नियमितपणे जीभ स्वच्छ केली नाही, तर त्यावर जंतू, बुरशीचा पांढरा थर जमा होऊ शकतो.
जिभेवर घाण, जंतू जमा झाल्याने तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.
जर जीभ स्वच्छ केली नाही, तर त्यावर पांढरा थर जमा होतो, जो तोंडाचे इन्फेक्शन वाढवतो.
जिभेवर पांढरा थर जमा झाल्याने जिभेवरची चव बदलते. पदार्थांची चव नीट लागत नाही.
बाजारात प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टीलचे टंग क्लिनर मिळतात ते तुम्ही जीभ स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
हे टंग क्लिनर जिभेच्या मागच्या भागापासून पुढच्या दिशेने हलक्या हाताने २ ते ३ वेळा स्क्रॅप करा.
दररोज सकाळी दात घासल्यानंतर न चुकता जीभ स्वच्छ करण्याची ही सवय ठेवा, यामुळे जीभेवरची घाण कमी होऊन जीभ स्वच्छ होईल.