Healthy Lifestyle ai
लाईफस्टाईल

Healthy Habits: कमी जेवायचं की पोटभर? जाणून घ्या जेवणाची योग्य पद्धत

Healthy Lifestyle: तंदुरुस्त आणि आजारांपासून लांब राहण्यासाठी सकस आहार घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद मिळते. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात, लोकांना व्यवस्थित बसून जेवायलाही वेळ मिळत नाही.

Saam Tv

तंदुरुस्त आणि आजारांपासून लांब राहण्यासाठी सकस आहार घेणं महत्वाचं असतं. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद मिळते. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात, लोकांना व्यवस्थित बसून जेवायलाही वेळ मिळत नाही. कामातून मोकळा वेळ नसल्याने ते घाईघाने जेवतात. त्यामुळे त्यांना पोटाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय काही मंडळी डाएट फॉलो करतात. मात्र दिवसभराच्या धावपळीत ते पाळले जात नाही.

अनेक जण दिवसभरात त्यांच्या ठरलेल्या वेळेतच जेवतात. तर काही लोक दिवसातून योग्य वेळेवर जेववर जेवत नाहीत. काही माणसं कमी जेवतात. तर काही वेळ जास्त. अशातच एक वर्ग थोडं थोडं जेवतो. अशा परिस्थितीत, प्रश्न पडतो की, खाण्याची कोणती पद्धत योग्य आहे आणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो? याचं उत्तर आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ...

कमी पण वारंवार खाल्याने काय होतं?

वजन नियंत्रण

कमी पण वारंवार खाल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म सक्रीय राहतं. तुम्ही थोडं थोडं खाता तेव्हा तुमच्या

शरीराला ते अन्न पचायला वेळ मिळतो. त्यामुळे वजनावर नियंत्रण राहतं.

रक्तातील साखरेचं नियंत्रण

तुम्ही जेव्हा कमी आहार घेता तेव्हा तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर आहे.

एकाच वेळी पोटभर जेवल्याने काय होतं?

जे लोक एकाच वेळी पोटभर जेवतात ते लोक दिवसातून दोन किंवा तीन वेळाच जेवतात. तर थोडं थोडं वारंवार खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. जे लोक वेळेवर आणि पोटभर खातात त्यांच्या पचनसंस्थेला अन्न पचन करायला जास्त वेळ लागत नाही. दिवसभर काम करणारे लोक बऱ्याच वेळेस ही पद्धत वापरतात. जेणेकरून त्यांच्या शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि त्यांचा वेळ देखील वाचतो. त्यामुळे एकाच वेळी जास्त खाणं टाळलं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT