Protein Supplement : प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी घातक?; प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार?

ICMR : शरीर कमावण्यासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी. प्रोटीन पावडर तसच प्रोटीन सप्लिमेंटबाबत ICMRनं गंभीर इशारा दिलाय.
Protein Supplement
Protein SupplementSaam Digital

मयुरेश कडव

शरीर कमावण्यासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी. प्रोटीन पावडर तसच प्रोटीन सप्लिमेंटबाबत ICMRनं गंभीर इशारा दिलाय. याबाबतचा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमागचं नेमकं सत्य काय आहे, पाहूयात रिपोर्ट

अलिकडच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन घेण्याचं प्रमाण वाढलंय. विशेष करून जिममध्ये जाणारे तरूण आवर्जून प्रोटीन सप्लिमेंट घेतात. बऱ्याचदा आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रोटिन्सचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. बाजारात पाव़डर तसच इतर स्वरूपात हे प्रोटीन उपलब्ध असतं. मात्र ICMR अर्थात इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका व्हायरल मेसेजमुळे सर्वांनाच धडकी भरलीय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात.

ICMRच्या गाईडलाईन्स नुसार प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेणाऱ्या लोकांमध्ये किडनी विकाराचं प्रमाण वाढलंय. याशिवाय त्यांची हाडंही खिळखिळी होतात. ICMRच्या या व्हायरल मेसेजमुळे प्रोटीनचं सेवन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडालीय. खरंच प्रोटीन पावडर घेतल्यानं आजार होतात का? साम टीव्हीनं याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.

Protein Supplement
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी गावठी उपाय; आठवडाभरात व्हाल स्लिम-ड्रिम

अतिरिक्त प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेतल्यानं अनेक विकारांचा सामना होऊ शकतो. किडनी विकारापासून ते हृदयरोगापर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीर कमावण्याच्या नादात, शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे आमच्या पडताळणीत प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी हानीकारक असल्याचा दावा खरा ठरलाय.

Protein Supplement
Breakfast Tips : नाश्त्याला चहा-चपाती खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम तुम्हाला माहितीयेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com