Pind Daan for stillborn baby saam tv
लाईफस्टाईल

Pitru Paksha 2025: गर्भात मृत पावलेल्या बाळाचं श्राद्ध केलं पाहिजे का? वाचा शास्त्र काय सांगतं?

Pind Daan for stillborn baby: बाळाचा जन्म होण्याआधीच गर्भपात झाला, त्या बाळासाठी श्राद्ध करावे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. अशा परिस्थितीत शास्त्र काय सांगते ते पाहूयात

Surabhi Jayashree Jagdish

  • पितृ पक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

  • गर्भात मृत बाळाचे श्राद्ध शास्त्रात नाही.

  • मलिन षोडशी विधी आत्मशांतीसाठी केला जातो.

पितृ पक्ष सुरू होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत. ७ सप्टेंबरपासून श्राद्ध पक्षाची सुरुवात होणार आहे. मान्यता अशी आहे की, या दिवसांत पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशाला आशीर्वाद देतात. श्राद्ध केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि घरातील पितृदोषही दूर होण्यास मदत होते.

लोकांना मोठ्या माणसांच्या श्राद्धविधींबद्दल माहिती असते, पण अनेकदा प्रश्न पडतो की गर्भात मृत झालेल्या मुलांचं श्राद्ध करतात का? तसंच जन्मल्यानंतर कोणत्या वयापर्यंतच्या मुलांचं श्राद्ध शास्त्रानुसार होत नाही? चला, हे समजून घेऊ.

गर्भात मृत झालेल्या बाळाचं श्राद्ध होतं का?

जर गर्भावस्थेतच बाळाचा मृत्यू झाला, तर शास्त्रांनुसार त्याचं श्राद्ध केलं जात नाही. अशा वेळी आत्मशांतीसाठी “मलिन षोडशी” या विधीचे पालन केलं जातं. मलिन षोडशी हा हिंदू धर्मातील एक विशेष संस्कार आहे, जो मृत आत्म्याच्या शांतीसाठी आणि घरावर होणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी केला जातो. हा विधी मृत्यू झाल्यापासून अंत्यसंस्कारापर्यंतच्या काळात पार पाडला जातो.

कितक्या वयापर्यंतच्या मुलांचे श्राद्ध नसते?

जन्मानंतर मृत्यू झालेल्या मुलांच्या श्राद्धाचे नियम त्याच्या वयावर अवलंबून असतात. दोन वर्षांपर्यंतच्या बालकांचे पारंपरिक श्राद्ध केलं जात नाही. अशा वेळीही मलिन षोडशी आणि तर्पण करून आत्म्याची शांती केली जाते. या मुलांसाठी वार्षिक श्राद्ध किंवा इतर विधी शास्त्रात सांगितलेलं नाहीत.

मुलांचं श्राद्ध कोणत्या दिवशी करावं?

सहा वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचं श्राद्ध मात्र पितृपक्षात त्यांच्या मृत्यूतिथीला केलं जातं. पण जर मृत्यूची तिथी माहीत नसेल, तर त्रयोदशी दिवशी श्राद्ध आणि तर्पण केल्यानेही आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून तिथी अज्ञात असल्यास त्रयोदशीच्या दिवशी विधी करणं योग्य मानलं गेलं आहे.

पितृ पक्ष २०२५ मध्ये कधी सुरू होत आहे?

पितृ पक्ष ७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होत आहे.

गर्भात मृत झालेल्या बाळासाठी कोणता विधी करावा?

मलिन षोडशी विधी आत्मशांतीसाठी करावा.

दोन वर्षांपर्यंतच्या मुलांचे श्राद्ध का केले जात नाही?

शास्त्रानुसार अशा मुलांचे पारंपरिक श्राद्ध नाही.

सहा वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचे श्राद्ध कोणत्या दिवशी करावे?

मृत्यूतिथीला किंवा त्रयोदशीला श्राद्ध करावे.

मृत्यूची तिथी माहीत नसल्यास श्राद्ध कधी करावे?

त्रयोदशीच्या दिवशी श्राद्ध करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

आमचं सर्वस्व गेलंय...पुरात १० वर्षांचा मुलगा वाहून गेला, कुटुंबीयांच्या डोळ्यातलं पाणी थांबेना | VIDEO

PMPL News : पुणेकरांसाठी खुशखबर! शहरातील रस्त्यांवर लवकरच धावणार डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT