World Asthma Day 2025 saam tv
लाईफस्टाईल

World Asthma Day: दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा? तज्ज्ञांनी सांगितल्या अस्थमाबाबत असलेल्या गैरसमजुती

World Asthma Day 2025: दमा हा काही एखाद्या व्यक्तीमधील कमकुवतपणा नाही तसेच ती काही लाजिरवाणी बाब नाही. अशा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांची पुरेपुर काळजी घ्यावी

Surabhi Jayashree Jagdish

World Asthma Day 2025: दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन म्हणून पाळला जातो. सध्या जगभरात दम्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्सचे फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ शाहिद पटेल यांनी सांगितलं की, जागतिक दमा दिन हा संपूर्ण जगात दम्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्याचप्रमाणे लोकांमध्ये या आजाराच्या उपचारांविषयी माहिती पोहोचवण्यासाठी, आणि दमा झालेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दम्याचा परिणाम कमी करण्यास मदत करण्यासाठी मानला जातो.

दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती

गैरसमज १: दमा हा केवळ लहान मुलांमधील आजार आहे

वास्तविकता: दमा बहुतेकदा बालपणात सुरू होतो, परंतु तो कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. प्रौढांमध्ये होणारा दमा हा सामान्यपणे आढळून येतो आणि त्यासाठी विशेष खबरदारी नियमित फॅालोअपची आवश्यकता आहे.

गैरसमज २ : सततच्या दम्याच्या औषधांचे एखाद्याला व्यसन लागू शकते

वास्तविकता: इनहेलर आणि इतर दम्याची औषधं ही व्यसन निर्माण करणारी नसतात. लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि गुंतागुंत रोखण्यासाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. भीतीपोटी त्यांना टाळल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

गैरसमज ३: दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा

वास्तविकता: योग्य व्यवस्थापनाने, दमा असलेल्या व्यक्ती देखील सक्रिय जीवनशैलीचे पालन करु शकतात आणि खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. खरं तर, नियमित व्यायामामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारते.

गैरसमज ४: इनहेलर फुफ्फुसांना कमकुवत करतात

वास्तविकता : इनहेलर थेट फुफ्फुसांमध्ये औषधं पोहोचविण्याचे काम करतात, दुष्परिणाम कमी करतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे संरक्षण केले जाते.

गैरसमज ५: दमा स्वतःहून निघून जातो

वास्तविकता : दमा हा एक जुनाट आजार आहे. योग्य व्यवस्थापनाने लक्षणं कमी होऊ शकतात, परंतु लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

गैरसमज ६: दररोज इनहेलर वापरणे म्हणजे दम्याचे स्वरुप गंभीर आहे

वास्तविकता : इनहेलरचा दररोज वापर हा दमा नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. लक्षणं अधिक तीव्र होऊ नये याकरिता इनहेलरची मदत होते तसेच त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.

गैरसमज ७: जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा तुम्ही दम्याची औषधांचे सेवन थांबवू शकता

वास्तविकता : वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन थांबविल्याने लक्षणे अचानक बिघडू शकतात किंवा त्यांची तीव्रता वाढु शकते. उपचारांमध्ये बदल करण्यापूर्वी नेहमी पल्मोनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Thane News : कुपोषित मुलीच्या उपचारासाठी पैसे नाहीत, आई-वडील हतबल; उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील प्रकार

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT