Fatty Liver Disease Saam TV
लाईफस्टाईल

Fatty Liver Disease : झोप पूर्ण झाली नाही तर तुमचं यकृत होईल खराब; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

Short Sleep Effect on Liver : काही व्यक्ती कामामुळे रात्री १ किंवा २ वाजता झोपतात. तसेच पुन्हा पहाटे ५ किंवा ६ वाजता उठतात. मात्र कमी झोप घेतल्याने याचा थेट परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो.

Ruchika Jadhav

झोप प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची असते. फोनची बॅटरी संपल्यावर तिला चार्ज करण्यासाठी विजेची गरज असते. तसेच माणसाला स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी झोपेची नितांत गरज असते. अन्न, पाणी आणि झोप प्रत्येक व्यक्तीच्या निरोगी आयुष्यासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत.

झोप न झाल्याने यकृत खराब

प्रत्येक व्यक्तीला ७ ते ८ तासांची झोप मिळलीच पाहिजे. मात्र अनेकदा कामाचा ताण वाढल्याने आपल्याला कमी वेळ झोप मिळते. काही व्यक्तींना टेन्शनमुळे बेडवर झोपलेले असताना देखील लवकर झोप लागत नाही, मात्र सकाळी लवकर उठायचे असते. त्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. रात्री ५ किंवा फक्त ६ तास झोपल्याने आपल्या यकृतावर याचा परिणाम होतो, अशी माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

चीनमधील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी येथे यावर संशोधन करण्यात आलं आहे. यामध्ये नॉन- अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर झोपेमुळे होत असल्याचं म्हटलं आहे. झोप पूर्ण न होणे यामुळे व्यक्ती मद्यपान करत नसतानाही यकृताला हाणी पोहचते असं सांगण्यात आलं आहे.

लिव्हर सिरोसिस

लिव्हर सिरोसिस हा अत्यंत जुना आजार आहे. यकृतावर सतत कमी झोप मिळत असल्याने हा त्रास होतो. यामुळे यकृताचं काम बिघडतं त्यामुळे यकृत खराब होण्यास सुरुवात होते.

लक्षणे

यामध्ये व्यक्तीला मळमळ होणे, भूक न लागणे, कावीळ, वजन कमी, अंगाला खाज, नाकातून रक्तस्त्राव, केस गळणे, सतत ताप येणे, काहीच लक्षात न राहणे अशा समस्या जाणवत असतात. त्यामुळे प्रत्येकासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे.

पुरेशी झोप न झाल्याने यकृतासह शरीरातील अन्य अवयवांवर देखील याचा गंभीर परिणाम दिसू लागतो. काही व्यक्तींना डोळे सुजने, डोळ्यांखाली काळी वर्तुळे वाढणे, डोकं दुखणे अशा विविध समस्या निर्माण होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्याच्या भेटीवरून रामदास कदम यांची राज ठाकरेंवर टीका

घ्या बोंबला! रुग्णालयातील ECG विभागात कुत्रे घुसले|VIDEO

South Indian -Fried Rice Recipe : फ्राईड राईसला द्या साउथ इंडियन तडका, रात्रीच्या जेवणाचा चटपटीत बेत

Muramba: ७ वर्षांनंतर रमा-अक्षय येणार आमने-सामने; मुरांबा मालिकेत आरोहीमुळे येणार नवा ट्विस्ट

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला दुसरा धक्का; रहाणेच्या फीडबॅकने कर्णधारपदाचा गेम झाला

SCROLL FOR NEXT