Mangalwar Upay saam tv
लाईफस्टाईल

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Hanuman puja on Tuesday: भगवान शिव आणि हनुमान यांचा संबंध खूप खोल आणि पवित्र मानला जातो. हनुमान हे भगवान शंकराचाच अकरावा अवतार असल्याचं मानलं जातं. त्यामुळे, जो शिवभक्त हनुमानाची पूजा करतो, त्याला महादेवाचाही विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • श्रावण महिन्यात मंगळवारी हनुमानजीची पूजा विशेष फलदायी मानली जाते.

  • हनुमान हे शिवाचेच रौद्र रूप मानले जातात, त्यामुळे दुहेरी कृपा मिळते.

  • हनुमान चालीसा वाचन आणि तेलाचा दिवा लावल्याने मनाला शांती मिळते.

श्रावण महिना हा भक्ती, उपासना आणि अध्यात्माचा सण मानला जातो. या महिन्याला जितकं महत्त्व सोमवारी मिळतं तितकंच महत्त्व मंगळवारी सुद्धा असतं. या दिवशी खास करून हनुमानजींची उपासना आणि पुजा केली जाते. शास्त्रांनुसार, मारुती हे भगवान शिवांचं रौद्र रूप मानले जातात.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, श्रावण महिन्यात मंगळवारी त्यांची आराधना केल्यास शिव आणि हनुमान दोघांचं एकत्र आशीर्वाद प्राप्त होतात. ज्यामुळे मानसिक, शारीरिक त्रास दूर होतात. श्रावणात मंगळवारी केल्या गेलेल्या काही विशिष्ट उपायांमुळे जीवनात शक्ती, आत्मविश्वास, यश, सुरक्षितता आणि सकारात्मकता येते. हे उपाय कोणते आहेत ते पाहूयात.

हनुमानजींची पूजा का विशेष?

श्रावण महिन्यात महिना हा शिव उपासनेचा काळ असतो आणि हनुमान हे शिवाचेच एक रूप मानलं जातं. त्यामुळे या काळात हनुमानजींची आराधना केल्यास शिवकृपा आणि मारुतीकृपा एकत्र प्राप्त होते. त्यामुळे जीवनातील अडचणी, मानसिक तणाव, शत्रु बाधा आणि ग्रहदोष यावर प्रभावी उपाय होतो.

मंगळवारी करायचे प्रभावी उपाय

हनुमान चालीसा पठण आणि तेलाचा दिवा

रात्री झोपण्याआधी हनुमानजींच्या फोटोसमोर किंवा मंदिरात तेलाचा दिवा लावा आणि श्रद्धेने हनुमान चालीसा वाचा. हे उपाय मनाची शांती, भीतीपासून मुक्ती आणि आत्मबल वाढवतात.

नारळ आणि सिंदूर अर्पण करा

लाल कापडात नारळ गुंडाळा त्यावर सिंदूर, पवित्र दोरा आणि तांदूळ अर्पण करून ते हनुमानजींना समर्पित करा. हे उपाय यश आणि कार्यसिद्धीसाठी फायदेशीर ठरतो.

पिंपळाखाली दिवा लावा आणि मंत्रजप करा

मंगळवारी संध्याकाळी पीपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि "ॐ रामदूताय नमः" या मंत्राचा जप करा. यामुळे ग्रह दोष कमी होतो आणि दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते.

हनुमान मंदिरात लाल झेंडा चढवा

सावनच्या प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात लाल झेंडा अर्पण करा. अशी श्रद्धा आहे की, या उपायामुळे मनोकामना लवकर पूर्ण होतात.

श्रावण महिन्यात मंगळवारचे विशेष महत्त्व काय आहे?

श्रावणातील मंगळवारी हनुमानजीची पूजा केल्याने शिव आणि हनुमान दोघांचा आशीर्वाद एकत्र मिळतो.

हनुमान चालीसा केव्हा वाचावी?

श्रावणातील मंगळवारी रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा वाचावी, तेलाचा दिवा लावून.

नारळ आणि सिंदूर का अर्पण करावे?

नारळ आणि सिंदूर अर्पण करणे यश, कार्यसिद्धी आणि शत्रुबाधा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

पिंपळाच्या झाडाखाली कोणता मंत्र जपावा?

"ॐ रामदूताय नमः" हा मंत्र जपल्याने ग्रहदोष कमी होतात आणि दारिद्र्य नष्ट होते

लाल झेंडा का चढवावा?

श्रावणातील प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात लाल झेंडा चढवल्याने मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

Wednesday Horoscope : पार्टनरसाठी पैसा खर्च करावा लागणार; प्रेमात वाद होणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Saturn Jupiter yog: 48 तासांनंतर पलटणार 'या' राशींचं नशीब; शनी-गुरु तयार करणार शतांक योग, मिळणार फक्त पैसा

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

SCROLL FOR NEXT