मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि शूर योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शूर, हुशार आणि दयाळू राज्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक गोष्टी केल्या. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
शिवाजीचे वडील विजापूरचे सेनापती होते, जे तेव्हा दख्खनच्या सुलतानाच्या ताब्यात होते. अशा परिस्थितीत आई जिजाबाई यांच्या संगोपनाचा शिवाजी महाराजांवर खूप प्रभाव पडला. बालपणीच त्यांनी रामायण, महाभारत यांसारखे धर्मग्रंथ काळजीपूर्वक वाचले आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून त्यांना आपल्या जीवनाचा भाग बनवले.
शिवाजी महाराजांना कोंडदेव यांच्याकडून हिंदू धर्माचे शिक्षण मिळाले, त्यांनीच त्यांना सैन्य, घोडेस्वारी आणि राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषिकांसाठी खूप काम केले, म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात देवासारखी पूजा केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या या विशेष प्रसंगी, आपण या मराठी शुभेच्छा, व्हॉट्सॲप संदेश, कोट्स, फेसबुक द्वारे हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी...
रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष
न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला
जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..!
शिवजयंती च्या शुभेच्छा!
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला..!
जय शिवराय
जळत असणार तर खुशाल जळा,
विझवणे माझे काम नाही
शत्रू ला जाळून राख नाही केले
तर हिंदू माझे नाव नाही
वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा !
तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा!
भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा!
माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.