salary growth canva
लाईफस्टाईल

Salary News: नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; खासगी कंपन्यांमध्येही होणार भरघोस पगारवाढ?

Salary Growth News: एप्रिल महिना सुरू झाला की नोकरदारांच्या आवडीची विषय तो म्हणजे पवारवाढ. पगारात किती टक्क्यांनी वाढ होणार आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. या वर्षी कोणत्या कंपनीमध्ये किती टक्के पगारवाढ होईल आणि कोणत्या पदांसाठी पगार वाढवण्यात असेल? याविषयी जाणून घेऊयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salary News : नोकरी,पगारवाढ आणि सुट्ट्या याचसंदर्भातील चर्चा आपण नोकरदार वर्गाकडून सातत्यानं ऐकतो. दिवसभरातील कामाचे तास, त्यातून मिळणारे वेतन, आणि संस्थेकडून मिळणाऱ्या इतर सोयीसुविधांच्या बाबतीत कर्मचारी नाराजीचा सूर आळवत असतात. त्यातही पगारवाढीच्या दिवसात जर मनासरखा पगार वाढवून मिळाला नाही, तर ही मंडळी नोकरी सोडून एखाद्या दुसऱ्या संस्थेत चांगल्या संधीच्या शोधात निघतात. तुम्ही देखील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी नक्की वाचा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या वर्षी मात्र वरिष्ठ अधिका-यांसाठी आनंदाची बातमी आहे. 'मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024' च्या एका अहवालानमुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावण आहे. या अहवालात आगामी काळात नोकरदारांना चांगला पगार मिळू शकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

माहितीनुसार, या वर्षी वरिष्ठ पदांवरील वेतनवाढ सरासरी 20 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 'मायकेल पेज इंडिया सॅलरी गाइड 2024' यांच्या माहितीनुसार, पारंपारिक उद्योगांमध्ये, विशेषतः उत्पादन आणि ऑपरेशनल भूमिकांमध्ये लोकांची भरती करण्यात येणार आहे. याशिवाय डेटा ॲनालिटिक्स, जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंग यांसारख्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मागणीही वाढली आहे.

https://saamtv.esakal.com/mumbai-pune/railway-job-requirements-mumbai-metro-job-mmrcl-9-various-post-sng88

मायकेल पेज ग्रुपचे एमडी अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५-४५ टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. मध्यम पातळीवरील अधिकाऱ्यांची पगारवाढ ३०-४० टक्के आणि वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांसाठी २०-२० टक्के पगार वाढ होऊ शकते. त्यासोबतच उत्पादन क्षेत्रात कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांना २०-४० टक्के, कनिष्ठ अधिकाऱ्यांना २५-४५ टक्के आणि वरिष्ठांना २०-४० टक्के पगारवाढ मिळणे अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT