Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 900 अकांनी उसळला Saam Tv
लाईफस्टाईल

Share Market : शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 900 अकांनी उसळला

शेअर मार्केटमध्ये आज चांगली तेजी दिसून आली आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: शेअर मार्केटमध्ये आज चांगली तेजी दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील (Stock market) सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारात (market) आज चांगली उसळण घेतली आहे. सकाळी १०.१० वाजेच्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) ९९९ अंकानी वधारला होता. तर निफ्टी २८४ अंकांनी वधारला आहे. शेअर मार्केट सुरू झाला. तेव्हा सेन्सेक्स ८०० अंकांच्या उसळणीसह ५७ हजार ६२० अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टीमध्ये देखील तेजी दिसून आली. निफ्टी (Nifty) १७ हजार २०० अंकांवर खुला झाला आहे.

हे देखील पहा-

बँकमध्ये देखील निफ्टीत आज जोरदार उसळण दिसून आली आहे. शिवाय बँक निफ्टीमधील सर्व १२ शेअर देखील तेजीत आहेत. बँक (bank) निफ्टी जवळपास ७०० अंकांनी म्हणजे जवळपास २ टक्क्यांनी उसळला आहे. बँक निफ्टी चांगली खरेदी दिसून येत आहे. शेअर बाजारात सर्व क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. फायनान्स क्षेत्रामध्ये देखील शेअरमध्ये तेजी असून २ टक्क्यांनी हे क्षेत्र वधारले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, कन्झ्युमर ड्युरेबल्ससह ऑईल आणि गॅस क्षेत्रात शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

बाजारात प्री- ओपनिंगमध्ये सेन्सेक्स ८०३.६३ अंकांनी म्हणजे १.४१ अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टी २२७ अंकांच्या उसळीनंतर १७२०२ अंकावर वधारला होता. दरम्यान, काल शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स १०३९ अंकांनी तर निफ्टीही ३१२ अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये १.८६ टक्क्यांची वाढ होऊन तो ५६८१६.६५ वर येऊन पोहोचला आहे. तर, निफ्टीमध्ये १.८७ टक्क्यांची वाढ होऊन तो १६,९७५.३० वर पोहोचला आहे. बुधवारी २२४१ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर, ११०५ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ९६ कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT