वाळू तस्कारांची मुजोरी, पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न, ३ गुन्हा दाखल

वाळूमाफिया हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याच्या याअगोदर देखील अनेक घटना घडले
Gevrai
Gevraiविनोद जिरे
Published On

बीड: जिल्ह्यात वाळू माफियांच्या विरोधामध्ये कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच (police) ते वाळूमाफिया हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याच्या याअगोदर देखील अनेक घटना घडले आहेत. आता परत एकदा वाळू माफिया (Sand Mafia) आणि थेट पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी 3 वाळू माफियां विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील (Beed) ही घटना गेवराई (Gevrai) तालुक्यातील खामगाव आणि सावरगाव परिसरात गोदावरी नदी (Godavari river) पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर छापा टाकताना ही धक्कादायक घटना घडली आहे. (Beed Attempt put tractor body policeman)

हे देखील पहा-

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या परिसरामध्ये 5 वाहनांसह 19 ब्रास वाळू असा एकूण 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही कारवाई (Action) करण्यात आली आहे. वराई तालुक्यातील खामगाव (Khamgaon) परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात साठवून ठेवलेली वाळू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आणि यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी गोदावरी नदीच्या पात्रात एका ट्रॅक्टरमध्ये ते अगदी वाळू भरली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते.

Gevrai
धुलिवंदनानिमित्त गाढवावरून जावयाची मिरवणूक काढण्याची तब्बल 90 वर्षांपासूनची परंपरा

यावेळी या पोलीस पथकातील खबरदार बालाजी दराडे आणि राजू वंजारे यांनी ट्रॅक्टरकडे धाव घेतली. मात्र, त्याचवेळी ट्रॅक्टर चालकानं ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत तिथून पळ काढला आहे. यावेळी प्रसंगावधान साधून हे दोन्ही पोलीस बाजूला झाले. मात्र इथं वाळू भरणाऱ्या दोघांनी हातामध्ये वाळू भरण्याचं खोरं या 2 पोलिसांकडे फिरवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पोबारा केला आहे.

दरम्यान, पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा ट्रॅक्टर चालक अनिल उर्फ अण्णा साळुंके, त्यानंतर सचिन उर्फ बँजो अंकल साळुंखे आणि आसमान उर्फ पप्पू या तिघांवर गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे हे 3 आरोपी जालना जिल्ह्यातील आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com