आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र, आज शेअर बाजार तेजीसह उघडला आहे आणि प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टी चांगल्या वाढीसह व्यवहार करताना दिसत आहे. काल अमेरिकन (America) बाजारांमध्ये देखील चांगली उसळी बघायला मिळाली आणि त्याचा परिणाम जागतिक बाजारातील (market) भावावर दिसून येत आहे. यामध्ये एसबीआय लाईफ, टाटा पॉवर,अरबिंदो फार्मा (Aurobindo Pharma) फोकसमध्ये दिसून येत आहे. (Share Market Latest News Updates)
हे देखील पहा-
आजच्या शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स २२१.२१ अंकांनी वाढल्यानंतर ५७,८१४ वर उघडला आणि निफ्टी ७५.२० अंकांनी वाढून १७,२९७ वर उघडला आहे. सुरुवातीच्या काळात सेन्सेक्सने ५७, ९०० चा टप्पा ओलांडला होता तर त्याच वेळी निफ्टीने सुरुवातीला १७,३०० ची पातळी ओलांडली होती. ऑटो, बँक, ऑइल आणि गॅस आणि मेटल स्टॉक्सच्या मजबूत सपोर्टमुळे शेअर बाजार (Share Market) सोमवारी तेजीसह बंद करण्यात आला होता. सेन्सेक्स (Sensex) २३१.२९ अंकांनी अर्थात ०.४० टक्क्यांनी वाढून ५७,५९३.४९ वर आणि निफ्टी (Nifty) ६९ अंकांनी म्हणजेच ०.४० टक्क्यांनी वाढून १७,२२२ बंद करण्यात आला.
बाजारातील अस्थिरतेमागची २ महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण वस्तूंच्या भावात झालेली वाढ, आणि दुसरे कारण भविष्यात कमाईच्या वाढीमध्ये येणारी घसरण असल्याचे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले आहे. उत्पादनांच्या भावात सतत वाढत आहेत आणि त्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे मागणी आणि मार्जिनवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले आहेत. विशेषत: चीनमध्ये वाढत्या कोविड प्रकरणांमुळे अनिश्चिततेमुळे कमजोरी देखील वाढली. तर रशिया आणि युक्रेनमधील शत्रुत्व संपुष्टात आल्याने वस्तूंच्या किमतीतील अस्थिरता कमी होणार आणि पुरवठ्यातील अडचणी कमी होतील असे देखील यावेळी ते म्हणाले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.