Navratri 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Navratri 2024 : नवरात्रोस्तवात या वस्तूंची नक्की खरेदी करा; घरात सुख शांती अन् समृद्धी नांदेल

Shardiya Navratri 2024 : नवरात्र उत्सव सुरू असताना नवमी किंवा अष्टमीला घरी पुजा केली जाते. यावेळी घरी काही वस्तू खरेदी करून आणणे फारच शुभ मानले जाते.

Ruchika Jadhav

संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. प्रत्येक व्यक्ती देवीची मनोभावे अराधना करत आहे. नवरात्र उत्सवाचा आजचा सहावा दिवस आहे. प्रत्येक दिवशी देवीला नवीन रंगाची साडी परिधान केली जाते. आज लाल रंग आहे. अशात लवकरच अष्टमी आणि नवमी येत आहे. या काळात देवीची पुजा करताना आपल्या घरी काही ठरावी वस्तू आणणे महत्वाचं असतं. त्याने घरात बरकत येते आणि समृद्धी वाढते. त्यामुळे आज या बातमीमधून याच गोष्टींची माहिती जाणून घेणार आहोत.

चांदीचं नाणं

नवरात्र उत्सव सुरू असताना या दिवसांत चांदीचं नाणं घेणे शुभ मानलं जातं. यात जर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला घरी चांदीचं नाणं घेऊन याल तर त्याने घरातील समृद्धी आणखी जास्त वाढते असं म्हटलं जातं. तुम्ही चांदीचं नाणं जेव्हा घरी आणता तेव्हा त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो आहे की नाही हे नक्की तपासा आणि मगच ते नाणं घरी घेऊन या. यामुळे घरात सदैव धनलक्ष्मी वर्षाव करते.

देवीसाठी सौभाग्याचं सामान

अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही देवीला सौभाग्याचं सामान सुद्धा देऊ शकता. यामध्ये मेहंदी, टिकली, कंगवा, बांगड्या, कुंकू, हिरवी साडी, ओढणी अशा विविध वस्तू तुम्ही देवीसाठी खरेदी करू शकता. या वस्तू देवीला दिल्याने त्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. जी महिला देवीला या वस्तू देते त्या महिलेला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद मिळतो.

पितळेचा कलश

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, पितळेचा कलश म्हणजे धन संपत्तीचं प्रतिक. त्यामुळे अष्टमी किंवा मग नवमीला तुम्ही घरी पितळेचा कलश घेऊन येऊ शकता. पुजेसाठी पाणी लागते आणि हे पाणी ठेवण्यासाठीच तुम्ही या पितळेच्या कलशचा वापर करू शकता.

मोरपंख

मोरपंख प्रत्येकाला आवडतो. मोरपंख आपल्याकडे सर्व गोष्टी खेचतो आणि आकर्षित करतो. त्यामुळे तुम्ही मोरपंख खरेदी करू शकता. मोरपंख नेहमी तुमच्या घरातील मंदिरात ठेवावा. मंदिरात मोरपंख ठेवल्याने त्या घरात कायम आनंदाचं वातावरण निर्माण होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होताच सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली

White Bread: नाश्त्यामध्ये पांढरे ब्रेड खाणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?

Crime: गरोदर गर्लफ्रेंडची हत्या, सीरियल किलर निघाला बॉयफ्रेंड; आरोपीने चौघांचा जीव घेतला

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा, परतीच्या प्रवासात गणेशभक्तांचे हाल

Maratha Reservation Row: मराठ्यांनो थोडं थांबा! सरकारने गडबड केलीय; कोणी केला हा सर्वात मोठा दावा|VIDEO

SCROLL FOR NEXT