Shardiya Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 Date: यंदा शारदीय नवरात्रौत्सव ८ की ९ दिवस? महाष्टमी, महानवमी आणि दसरा तिथी कधी? जाणून घ्या

Shardiya Navratri Festival : शारदीय नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते.

कोमल दामुद्रे

Shardiya Navratri Ashtami Navami Tithi :

हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव १५ ऑक्टोबरपासून ते २४ ऑक्टोबरपर्यंत हा सण साजरा केला जाणार आहे.

शारदीय नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते. दरवर्षी नवरात्रीची अष्टमी आणि नवमीतच्या तिथीमध्ये वाढ किंवा घट होते. त्यामुळे यंदा शारदीय नवरात्री किती दिवस असणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊया महाष्टमी, महानवमी आणि दशमी कोणत्या तारखेला साजरी केली जाईल?

1. शारदीय नवरात्रौत्सव कधी पासून?

हिंदू पंचागानुसार शारदीय नवरात्रीची प्रतिपदा तिथी ही शनिवारी, १४ ऑक्टोबर रोजी रात्री ११:२४ वाजता सुरू होईल. उदय तिथीनुसार ही प्रतिपदा तिथी १५ ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यामुळे कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त रविवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४४ ते दुपारी १२.३० पर्यंत असेल.

2. शारदीय नवरात्रीची महाष्टमी आणि महानवमी तिथी कधी?

शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 22 ऑक्टोबरला रविवारी साजरी होणार आहे. या दिवशी महागौरीची पूजा केली जाईल. तर २३ ऑक्टोबर रोजी महानवमी साजरी करण्यात येईल. या दिवशी हवन आणि कन्या पूजन केले जाते.

3. विजयादशमी 2023 कधी आहे?

नवरात्रीची (Navratri) सांगता अर्थात विजयादशमी मंगळवारी २४ ऑक्टोबरला आहे. विजयादशमीला दसरा (Dasara) असेही म्हणतात.

4. शारदीय नवरात्री तिथी

  • १५ ऑक्टोबर – देवी शैलपुत्री (प्रतिपदा तिथी)

  • १६ ऑक्टोबर – देवी ब्रह्मचारिणी (द्वितीया तिथी)

  • १७ ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा (तृतीया तिथी)

  • १८ ऑक्टोबर – देवी कुष्मांडा (चतुर्थी तिथी)

  • १९ ऑक्टोबर – देवी स्कंदमाता (पंचमी तिथी)

  • २० ऑक्टोबर – देवी कात्यायनी (षष्ठी तिथी)

  • २१ ऑक्टोबर – देवी कालरात्री (सप्तमी तिथी)

  • २२ ऑक्टोबर – देवी महागौरी (दुर्गा अष्टमी)

  • २३ ऑक्टोबर – महानवमी (नवमी)

  • २४ ऑक्टोबर – दशमी तिथी (दसरा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT