Shardiya Navratri 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीनंतर कलशातील पाणी आणि नारळाचा असा करा वापर, दुर्गा देवी राहिल नेहमी प्रसन्न

After Navratri 2023 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करताना कलश बसवण्याची परंपरा आहे.

Shraddha Thik

Navratri 2023 :

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करताना कलश बसवण्याची परंपरा आहे. त्यात नारळ, तांदूळ, पाणी हे वापरले जाते. अनेक घरांमध्ये जिथे कलश बसवलेला नाही, तिथे नऊ दिवस देवीच्या मूर्ती किंवा फोटोजवळ नारळ ठेवला जातो.

आता प्रश्न असा पडतो की नवरात्रीनंतर कलशावर किंवा मूर्तीजवळ ठेवलेल्या नारळाचे काय करायचे? खरं तर, असे मानले जाते की जर या नारळाची योग्य प्रकारे वापल केला नाही तर देवीचा कोप होऊ शकतो. याशिवाय, तुमच्या 9 दिवसांच्या पूजेचे (Puja) एकूण फळ मिळण्यात अडचण येऊ शकते.

कलश काढताना काळजी घ्या

पंडित आचार्य अविनाश मिश्रा यांनी सांगितले की, नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केली जाते आणि माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कलश बसवताना त्यावर नारळ ठेवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण सर्व विधी करून कलशाची प्रतिस्थापना करतो, त्याचप्रमाणे कलश काढताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. असे न केल्यास माता दुर्गा रागावू शकते आणि नऊ दिवस केलेल्या उपासनेचे फळ (Fruits) आपल्याला मिळत नाही, अशी धार्मिक धारणा आहे.

कलशातील नारळाचा अशा प्रकारे वापर करा

नवरात्रीनंतर आपण कलशावर ठेवलेला नारळ (Coconut) लाल कपड्यात बांधून आपल्या पूजेच्या खोलीत ठेवू शकतो. असे मानले जाते की असे केल्याने देवी आपल्या भक्तांना वर्षभर आशीर्वाद देते. तसेच देवी आपल्याला संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देते.

नारळ लाल कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दरवाजावर बांधता येतो. नंतर पुढच्या नवरात्रीनंतर आधीचा बांधलेला नारळ नदीत समर्पित करावा आणि त्या जागी नवरात्रीनंतर कलशातून काढलेला नारळ त्याच प्रक्रियेने बांधावा.

जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्ही तो नारळ तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही ठेवू शकता. यामुळे व्यवसायात भरभराट राहते.

नवरात्रीमध्ये पारणावरील कलश काढून टाकल्यानंतर नारळाचा प्रसाद कुटुंबातील सदस्यांमध्येही वाटता येईल किंवा कलशातील नारळ नदीत वाहवता येईल. कन्यापूजेत नारळाचा प्रसादही वाटता येतो.

अक्षताचे काय करायचे

घटस्थापनेवेळी अक्षता (तांदूळ) कलशाखाली ठेवतात. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कलश काढल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तांदूळ शिंपडावे. हिंदू धर्मात तांदूळ हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की घरात कलशाखाली ठेवलेला तांदूळ शिंपडल्याने कधीही आर्थिक तंगी होत नाही. तसेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि समाधानी राहते.

कलशातील पाण्याचे काय करावे

कलश काढल्यानंतर त्याचे पाणी घरात सर्वत्र शिंपडावे. सदस्यांवरही पाणी शिंपडावे. जर तुम्ही व्यापारी असाल तर ते पाणी व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा, शेतकरी असाल तर शेतात पाणी शिंपडा नाहीतर तुम्ही लावलेल्या रोपांना पाणी टाका असे केल्याने सुख-समृद्धी टिकून राहते. याशिवाय नवरात्र संपल्यानंतर पूजा साहित्य नदीत अर्पण करता येते. असे मानले जाते की असे केल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा दोष येत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Latur: मिरवणुकीदरम्यान बैल अचानक उधळला, ग्रामस्थ सैरावैरा पळू लागले; VIDEO व्हायरल

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT