Shani Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Gochar 2024 : शनिचा कुंभ राशीत प्रवेश! ५ राशींना अच्छे दिन, नात्यात येईल गोडवा

Shani Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असते. अशातच १८ मार्चला शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे.

कोमल दामुद्रे

Shani Gochar In Kumbh Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असते. अशातच १८ मार्चला शनिचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे.

३० वर्षानंतर कुंभ राशीचा शनिचा उदय होईल. शनि कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करुन साडे सातीच्या कठीण टप्प्यातून जात असलेल्या मकर आणि कुंभ राशीला काही प्रमाणात दिलासा मिळेल. परंतु, शनिचे संक्रमण चांगले आणि वाईट असे दोन्ही स्वरुपाचे फल मिळेल. कुंडलीतील शनीच्या स्थानावर करिअर, पैसा (Money) आणि वैवाहिक जीवनावर अवलंबून असते. ज्यावेळी शनि शुभ असतो तेव्हा शुभफले मिळतात. जाणून घेऊया शनिचा कोणत्या पाच राशींना फायदा होणार आहे.

1. मेष

शनिचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ मानले जात आहे. या काळात नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. अचानक धनलाभ होईल. नोकरीची ऑफर (Offer) मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल.

2. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या उदयामुळे शुभ परिणाम मिळतील. या काळात कामात यश मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होईल.

3. सिंह

शनीच्या उदयामुळे सिंह राशीच्या लोकांना शुभ फले मिळतील. पार्टनरशीपमध्ये (Partner) यश मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. लोखंड, तेल आणि खाणकाममध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला लाभ होईल.

4. कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय शुभ राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. प्रेम, व्यवसाय, नोकरीत ताळमेळ बसेल. गुंतवणुक केल्यास भविष्यात फायदा होईल.

5. धनु

राजकारणाशी संबंधित लोकांना मोठे पद मिळेल. व्यावसायिकांना या काळात नव्या डीलचा फायदा होईल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास लाभदायी ठरेल. मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: प्रजासत्ताक दिनी पंचांगाचा प्रभाव; २६ जानेवारीला कोणत्या राशींना मिळणार लाभ?

Maharashtra Live News Update: दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ध्वजारोहण, कर्तव्यपथावर दीड तास परेड चालणार

Sweets Recipe : अचानक घरी पाहुणे आले? ब्रेडपासून बनवा 'ही' शाही स्वीट डिश, चव अशी की सगळेच म्हणतील WOW

Vidur Niti: समाजात तुमची इमेज खराब करतात 'या' 4 सवयी; वेळीच तुमच्या सवयी सुधारा

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच राधा पाटीलचं मोठं विधान, 'लावणी'वरून हिणवणाऱ्यांना रडत रडत दिलं उत्तर|VIDEO

SCROLL FOR NEXT