Vastu Tips
Vastu TipsSaam Tv

Vastu Tips : ऑफिस डेस्कवर कधीच ठेवू नका या ५ गोष्टी, प्रमोशनमध्ये येतील अडचणी

Never Keep These 5 Things On Your Desk : आपण आपल्या घराची जितकी काळजी घेतो तितकीच काळजी आपण आपल्या ऑफिस डेस्कची देखील घेतो. अनेकांना ऑफिस डेस्क सजवण्याची आवडते.
Published on

Vastu Plants For Office :

हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला अधिक महत्त्व आहे. घरात कोणतीही वस्तू ठेवताना आपल्याला दिशा सांगितली जाते. घरातील प्रत्येक कोना हा महत्त्वाचा आहे. ज्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी येण्यास मदत होते.

आपण आपल्या घराची जितकी काळजी घेतो तितकीच काळजी आपण आपल्या ऑफिस डेस्कची देखील घेतो. अनेकांना ऑफिस डेस्क सजवण्याची आवडते. वर्क स्टेशनवर अनेकांना फोटो फ्रेम किंवा झाडे (Plant) ठेवतात. पण असे करणे टाळायला हवे. ही झाडे तुम्हाला कितीही सुंदर वाटत असली तरी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकतात. जर तुम्ही देखील या ५ झाडापैकी कोणत्या वनस्पती ठेवत असतील तर आताच थांबा. यामुळे प्रगतीत अडथळे येतील. तसेच वनस्पतीमधून निघणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरणार नाही. जाणून घेऊया वास्तुनुसार (Vastu Tips) ऑफिसमध्ये (Office) कोणती झाडे लावणे टाळायला हवे.

1. बांबूचे झाडे

ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप ठेवणे अनेकांना आवडते. परंतु, वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर बांबूचे रोप ठेवल्याने कामाच्या ठिकाणी तणाव निर्माण होतो. तसेच तुमच्या सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.

Vastu Tips
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार शुभ कार्यात स्वस्तिक बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा, अनेक संकटांपासून होईल सुटका

2. निवडुंग

निवडुंगाचे रोप हे काटेरी आहे. तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कधीही ठेवू नये. यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा तुमच्या कामावर परिणाम होतो. यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करु शकत नाही.

3. कोरफड

कोरफड जेल फायदेशीर आहे पण ऑफिस डेस्कवर ठेवणे टाळावे. ऑफिसच्या डेस्कवर कोरफड ठेवल्याने प्रमोशनमध्ये अडचणी येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार कोरफडचे रोपटे डेस्कवर ठेवल्याने सहकार्यांशी सतत वाद होतात.

Vastu Tips
Surya Gochar 2024 : १८ वर्षांनंतर सूर्य-राहूची मीन राशीत युती! या ५ राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणारे, मिळेल बक्कळ पैसा

4. गुलाब

गुलाबाचे रोपटे दिसायला छान असते. ऑफिसच्या डेस्कवर गुलाबाचे रोप देखील ठेवू नका. या काटेरी वनस्पतीमुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला अधिक निराशेला देखील सामोरे जावे लागते.

5. तुळस

तुळशीचे रोप हे पवित्र आहे. परंतु, डेस्कवर हे ठेवू नये. आपल्या निष्काळजीपणामुळे त्याची हानी होऊ शकते. त्यासाठी तुळस ही घराच्या अंगणात लावा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com