Shani Dev Remedies Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Dev Remedies : 'या' 3 गोष्टी कधीही फुकटात घेऊ नका अन्यथा, बिघडेल तुमच्या राशीतला शनि !

कुंडलीत असणाऱ्या प्रत्येक ग्रहाला त्याच्या विशिष्ट परिक्रमा पार करुन त्याचे फळ द्यावे लागते.

कोमल दामुद्रे

Shani Dev Remedies : हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाचे त्याच्या राशीनुसार फळ प्रत्येकाला मिळत असते. कुंडलीत असणाऱ्या प्रत्येक ग्रहाला त्याच्या विशिष्ट परिक्रमा पार करुन त्याचे फळ द्यावे लागते. ग्रहमानानुसार सगळ्यात कडक ग्रह शनि ज्याचा अनेकांवर चांगला वाईट परिणाम होत असतो.

शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हटले जाते. तो मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्याचा राग अत्यंत हानिकारक मानला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येकाला त्याचा रागाला बळी पडायचे नसेल तर त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात.

ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाची नकारात्मक दृष्टी टाळण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. काही गोष्टी कधीही फुकटात घेऊ नयेत असे सांगण्यात आले आहे. यामुळे शनिदेव क्रोधित होतात. जाणून घेऊया त्याबद्दल

1. उडीद डाळ

शनिदेवाचा प्रकोप टाळायचा असेल तर उडीद डाळ कधीही फुकट घेऊ नये. यामुळे शनि देवाला राग येऊ शकतो आणि तुम्हाला अनेक समस्यांनी घेरले जाऊ शकते. मोहरीचे तेलही फुकटात घेऊ नये. यामुळे शनीची अशुभ स्थिती होऊ शकते.

2. लोखंड

लोखंडापासून बनवलेल्या वस्तूही शनिवारी फुकटात घेऊ नयेत. यामुळे शनिदेव क्रोधित होऊ शकतात आणि तुमच्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू शकतो. यासोबतच या दिवशी लोखंडाची खरेदी किंवा विक्री करू नका. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.

3. तीळ

फुकटात तीळ घेतल्यानेही शनिदेव कोपतात. त्यामुळे त्यांची नकारात्मक दृष्टी कमी होऊ लागते. कोणत्याही व्यक्तीकडून कोणतेही काम फुकटात करून घेऊ नका. त्याला पैसे द्या आणि जर त्याने ते घेतले नाही तर त्याला काहीतरी वस्तू द्या. असे न केल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

MPSC परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

SCROLL FOR NEXT