Shani Asta 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Shani Asta 2024 : कुंभ राशीत शनिचा अस्त! ४ राशींची साडेसाती संपणार, प्रेमाचे नाते बहरणार

Shani Asta Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे विशेष्ट वेळेनुसार संक्रमण आणि अस्त होत असतो. अशातच ११ फेब्रुवारीला शनि देव कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना तोटा.

कोमल दामुद्रे

Shani Asta In Kumbh Rashi 2024 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे विशेष्ट वेळेनुसार संक्रमण आणि अस्त होत असतो. अशातच ११ फेब्रुवारीला शनि देव कुंभ राशीत अस्त होणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काहींना तोटा.

शनिदेवाला पापी आणि क्रूर ग्रह म्हणतात. शनिदेवाच्या अशुभ प्रभावाची भीती सर्वांनाच असते. परंतु, ग्रहांच्या हालचालीमुळे शनिदेव रंकालाही राजा बनवू शकतो. सध्या शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. लवकरच त्यांचा अस्त होईल. त्यामुळे काही राशींचे (Rashi) भाग्य उजळणार आहे. यांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कोणत्या राशींची साडेसाती संपेल जाणून घेऊया.

1. मेष

शनिच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला खूप फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक (Marriage) जीवन आनंदी राहिल.

2. मिथुन

शनिदेवाच्या अस्तामुळे जीवन आनंदाने भरुन जाईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक (Money) समस्यांपासून सुटका होईल. नशीब पूर्णपणे साथ देईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.

3. सिंह

सिंह राशींच्या लोकांना शनिदेवाच्या अस्तामुळे फायदा होणार आहे. सुख, समृद्धी आणि सौभाग्यामध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवाल. आर्थिक बाजू भक्कम असेल, पैसा हुशारीने खर्च कराल. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.

4. धनु

शनिदेवाच्या कृपेने शुभ परिणाम प्राप्त होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदाासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कामात यश मिळेल. सुख, समृद्धी, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update : सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी प्रेत ठेवले थेट ग्रामपंचायतमध्ये

SCROLL FOR NEXT