Shreya Maskar
अनेकांना वर्षाचे १२ ही महिने सर्दी होते. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होतो, कायम अस्वस्थ वाटते. यावर रामबाण उपाय जाणून घेऊयात.
डाव्या कानात साधा, स्वच्छ आणि कोरडा कापूस घाला. औषधी कापूस वापरू नये. तुमचे नाव बंद होत असेल किंवा तुम्हाला सायनसचा त्रास असेल तर वेखंड आणि आंबेहळद गुणकारी ठरेल.
वेखंड आणि आंबेहळद उगाळून त्याचा लेप नाकाच्या बाहेरच्या भागावर आणि सायनसच्या आसपास लावा. नाकाच्या आता आणि डोळ्यांच्या अगदी जवळ लावू नये.
तुम्ही धुळीच्या ठिकाणी जाताना नेहमी तोंडाला मास्क लावा. यामुळे धुळीपासून संरक्षण होते, नाकाची अॅलर्जी कमी होण्यास मदत मिळते.
तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर डॉक्टरांच्या मदतीने नेमकं कारण काय शोधा आणि त्यावर त्वरित उपाय करा. आपली दिनचर्या सुधारा.
व्हायरल इन्फेक्शन, धूळ, अपुरी झोप, शरीराची अस्वच्छता, टेन्शन, धूम्रपान आणि जंक फूड यामुळे वारंवार सर्दी होते.
सर्दी टाळण्यासाठी पेनकिलर घेणे टाळा, अति थंड खाऊ नका, झोप पूर्ण करा आणि सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.