Shadashtak Yog 2023
Shadashtak Yog 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Shadashtak Yog 2023 : या 4 राशींच्या मागे लागणार मंगळ-शनि युती; काळजी घ्या, आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण...

कोमल दामुद्रे

Mangal Shani 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे संक्रमण झाल्यानंतर त्याचे आपल्यावर शुभ-अशुभ प्रभाव पडत असतात. या योगांमुळे त्या त्या राशींना अधिक परिणांमाना सामोरे जावे लागते. 10 मे रोजी मंगळ संक्रमणानंतर कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यापूर्वी 17 जानेवारीला शनीने 30 वर्षांनी त्रिकोण राशी म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला होता.

या ग्रह संक्रमणांमुळे मंगळ सध्या शनिपासून सहाव्या स्थानावर आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे मंगळ आणि शनीच्या सध्याच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होत आहे, जो अत्यंत अशुभ मानला जातो. आता मंगळ 30 जून 2023 पर्यंत कर्क राशीत राहील, त्यामुळे हा षडाष्टक योग 30 जून 2023 पर्यंत राहील. हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.

षडाष्टक योग या राशींसाठी अशुभ आहे

1. कर्क -

30 जूनपर्यंत कर्क राशीच्या लोकांना अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे या काळात कुठेही गुंतवणूक (Investment) करणे टाळा. तसेच आरोग्याची (Health) काळजी घ्या.

2. सिंह -

मंगळ-शनिमुळे तयार झालेला षडाष्टक योग सिंह राशीच्या लोकांना अशुभ परिणाम देईल. अपयशांना सामोरे जावे लागू शकते. ऑफिसमध्ये (Office) अनेक प्रकारच्या समस्या आणि आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी वादापासून दूर राहा. खर्च वाढतील.

3. धनु -

30 जूनपर्यंत षडाष्टक योगामुळे धनु राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी. गुंतवणूक करू नका. जवळची व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. त्यामुळेच कोणाच्याही चर्चेत एकवेळ पडू नका. शक्यतो प्रवास करणे टाळा.

4. कुंभ

कुंभ राशीचा स्वामी शनि आहे आणि यावेळी शनि फक्त कुंभ राशीत असतो. षडाष्टक योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. तब्येतीची काळजी घ्या आणि अडचणी येऊ शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

SCROLL FOR NEXT