Ancient artifacts found saam tv
लाईफस्टाईल

Lost city underwater: शेवटच्या हिमयुगानंतर पाण्याखाली गेलेलं शहर शास्त्रज्ञांनी शोधलं; ८,५०० वर्षांपासून समुद्राखाली जागेवरून सापडल्या अनेक गोष्टी

Ancient artifacts found: मानवी सभ्यतेच्या इतिहासाचे अनेक रहस्य अजूनही समुद्राच्या खोल गर्भात दडलेले आहेत. नुकतेच, वैज्ञानिकांच्या एका चमूने एक अविश्वसनीय वैज्ञानिक शोध लावला आहे. शेवटच्या हिमयुगानंतर (Ice Age) समुद्रात बुडालेले एक संपूर्ण जलमग्न शहर त्यांना सापडले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • डेन्मार्कमध्ये ८,५०० वर्षांपूर्वीचे शहर सापडले आहे.

  • हे शहर समुद्राखाली वाढलेल्या पातळीमुळे गेले.

  • येथे दगडी हत्यारे आणि लाकडाचे अवशेष मिळाले.

डेन्मार्कमध्ये समुद्राखाली तब्बल ८,५०० वर्षांपूर्वीचे एक शहर सापडलं आहे. शेवटच्या हिमयुगानंतर बर्फाचे प्रचंड थर वितळले आणि समुद्राची पातळी वाढल्याने हे छोटं शहर पाण्याखाली गेले. या प्राचीन वसतीस्थानाला कधी कधी “स्टोन एज अटलांटिस” असंही म्हटलं जातं. हे डेन्मार्कच्या आरहूस उपसागरात आढळलं आहे.

पुरातत्त्वज्ञांनी सुमारे ४३० चौरस फूट क्षेत्रात उत्खनन केल्यानंतर असता दगडी हत्यारं, बाणांचे टोक, प्राण्यांच्या हाडांचे तुकडे आणि लाकडाचा एक भाग मिळाला. संशोधकांच्या मते, हा लाकडाचा तुकडा एक साधन असू शकतो. या वस्तू सिद्ध करतात की या ठिकाणी लोक वास्तव करत होते आणि त्यांनी व्यवस्थित जीवनशैली निर्माण केली होती.

पाण्याखालील पुरातत्त्वज्ञ पीटर मो एस्त्रुप यांनी सांगितलं की, हे ठिकाण म्हणजे एक 'टाइम कॅप्सूल' आहे. कारण ते ऑक्सिजनशिवाय पाण्याखाली असल्याने सर्व वस्तू आजही उत्तम स्थितीत टिकून राहिल्या आहेत. जणू या ठिकाणी वेळच थांबून गेली आहे.

शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे?

शास्त्रज्ञांना विश्वास आहे की, समुद्र अजूनही मेसोलिथिक काळातील अनेक गुपितं दडवून ठेवत आहे. ते पुढे मासेमारीसाठी वापरली जाणारी साधनं, हरपून आणि इतर वस्तू शोधण्याची अपेक्षा करत आहेत. यामुळे त्या काळातील लोक कशी जगली, काय खात होती आणि बदलत्या निसर्गाशी त्यांनी कशी जुळवून घेतली हे समजून घेता येईल.

ही शोधमोहीम तब्बल ६ वर्षांची असून तिच्यावर १५.५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले जात आहेत. या प्रकल्पाअंतर्गत बाल्टिक आणि नॉर्थ सीच्या तळाशी दडलेली स्टोन एज वसाहती शोधल्या जात आहेत. या उन्हाळ्यात संशोधकांनी आरहूसजवळ २६ फूट पाण्याखाली जाऊन विशेष पाण्याखालील व्हॅक्यूमच्या साहाय्याने पुरावशेष गोळा केले. त्यांनी प्रत्येक तुकडा काळजीपूर्वक स्कॅन करून एकत्र जोडला ज्यातून त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या जीवनाचा अंदाज लावला.

आता पुढील टप्प्यात शास्त्रज्ञ नॉर्थ सीतील अजून दोन स्थळांवर उत्खनन करणार आहेत. मात्र ते अधिक कठीण ठरणार आहे. कारण त्या भागातील समुद्राच्या स्थिती वेगळ्या आहेत. संशोधकांच्या मते, या प्राचीन वसाहतींचा अभ्यास केल्याने माणसाने समुद्राची पातळी वाढत असताना आणि किनारे बदलत असताना कशी जुळवाजुळव केली हे समजू शकते.

डेन्मार्कमध्ये सापडलेले प्राचीन शहर किती वर्षांपूर्वीचे आहे?

तब्बल ८,५०० वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर सापडले आहे.

या शहराला कोणते नाव दिले जाते?

या शहराला “स्टोन एज अटलांटिस” असेही म्हटले जाते.

पाण्याखालील वस्तू का चांगल्या स्थितीत आहेत?

ऑक्सिजनअभावी वस्तू चांगल्या स्थितीत टिकून राहिल्या आहेत.

शास्त्रज्ञांनी कोणत्या समुद्रात उत्खनन केले?

आरहूस उपसागरात, बाल्टिक आणि नॉर्थ सीत उत्खनन केले आहे.

या शोधाचे महत्त्व काय आहे?

मानवाने समुद्रपातळी वाढीशी कसे सामने दिले ते समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सिडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT