Contact lenses For Blind saamtv
लाईफस्टाईल

Science Technology: आता अंधारातही लख्ख दिसणार? दृष्टीहिनांना मिळणार दिव्यदृष्टी

Contact lenses For Blind: आता अंधारातही तुम्हाला लख्ख दिसणार आहे. चिनी शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगानं माणसालाही सुपर व्हिजन मिळवत येणाऱ आहे. हा प्रयोग नेमका काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

आता अंधारात चाचपडायची गरज नाहीय. कारण अंधारातही माणसाला दिवसासारखंच लख्ख पाहता येणार आहे. एक कॉन्टेक्ट लेन्स डोळ्याला लावली की साप आणि वटवाघुळासारख अंधारात पाहणं माणसालाही जमू शकेल.

चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या एकत्रित संशोधनातून ही लेन्स तयार करण्यात आली आहे. पूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून पाहिली, यासाठी उंदारांच्या डोळ्यांमागे इंजेक्शन दिले जात होते. मात्र आता शास्त्रज्ञांनी नॅनो पार्टीकलच्या सहाय्याने कॉन्टॅक्ट लेन्सद्वारे सुपरव्हिजन मिळण्याचे तंत्रज्ञान विकसित केलंय. मानवी डोळ्याची दृष्टी क्षमता ही 380 to 780 nanometers इतकी आहे.

मात्र ही लेन्स लावल्यानंतर ही क्षमताच 700 nm – 1 mm पर्यंत म्हणजे इन्फ्रारेड लाईट ही पाहणं शक्य होईल.या कॉन्टेक्ट लेन्ससाठी विजेची किंवा बॅटरीचीही गरज नाही. भविष्यात तापमानावरून एखादी वस्तू ओळखता येईल. या तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे करता येईल पाहूयात.

सैनिकांना अंधारात शत्रूवर नजर ठेवणं शक्य

इन्फ्रारेडने पाठवलेले संदेश वाचता येणार

रंग आंधळेपणाच्या उपचारांमध्ये उपयुक्त

कमी प्रकाशात, धुक्यात किंवा धूळीतही पाहण्याची क्षमता

कोणत्याही ऊर्जा स्त्रोताशिवाय पाहण्याची क्षमता

भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात करणं शक्य होईल. दृष्टीहिनांसाठी तर हे वरदानच ठरू शकेल. हे तंत्रज्ञान म्हणजे माणसाच्या नजरेला असणाऱ्या मर्यादा नाहीश्या करण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्वाचं पाऊल मानावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT