Science News Saam Tv
लाईफस्टाईल

Science News : संशोधनातून सिद्ध ! गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा आकार बदलला; ती आता गोल दिसणार नाही...

आजही संशोधकांना पृथ्वीवर आश्चर्यकारक गोष्टी सापडतात. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले.

कोमल दामुद्रे

Science News : वैज्ञानिकाच्या मते, जितके शोध आपण स्पेस मध्ये लावू शकतो त्यापेक्षा जास्त पृथ्वीवर याचे रहस्य दडलेले आहे. आजही संशोधकांना पृथ्वीवर आश्चर्यकारक गोष्टी सापडतात. अलीकडेच, शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले, ज्याचे परिणाम केवळ आपल्यालाच नाही तर शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करणारे आहेत. त्यातील एक पृथ्वीचा आकार.

गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीची (Earth) निर्मिती झाली. एका ठिकाणी गुरुत्वाकर्षणाने सर्व गोष्टींना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचा आकार बदलला. पृथ्वीच्या भोवती गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. (Latest Marathi News)

पण हे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल करत असते. एका नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या खोलीतून वरच्या पृष्ठभागांना कसे हादरवत आहे. त्याचे केंद्र सध्या भारताच्या (India) अंतर्गत आहे.

पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा ग्रह सतत बदलत असतो. यामुळे पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर म्हणजेच कवचांमध्ये अनेक फरक आहेत. भूकंपाच्या वेळी, जेव्हा दोन टेक्टोमिक प्लेट्सची टक्कर होते, तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठे बदल दिसून येतात. अशा आपत्तींमध्ये अप्रत्यक्षपणे गुरुत्वाकर्षणाची मोठी भूमिका असते.

अशा संरचना तयार केल्या जात आहेत, ज्यांना मेटामॉर्फिक कोर कॉम्प्लेक्स म्हणतात. मेटामॉर्फिक कोअर कॉम्प्लेक्सच्या निर्मितीची प्रक्रिया अनेक वेळा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच्या निर्मितीचे गूढ अधिकच गडद होत गेले.

यावेळी शास्त्रज्ञांनी दोन मेटामॉर्फिक कोर कॉम्प्लेक्स निवडले. अमेरिकेचे फिनिक्स आणि लास वेगास. कारण हे दोन्ही पर्वत संपल्यानंतर तयार झाले आहेत. शास्त्रज्ञांनी शोधून काढले की मेटामॉर्फिक कोर कॉम्प्लेक्समागील कारणे काय आहेत.

त्यांच्या निर्मितीबद्दल अनेक भिन्न सिद्धांत आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या धोकादायक नैसर्गिक आपत्ती येतात. हे सगळे वातावरणातील बदल गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे अप्रत्यक्षपणे होत आहेत आणि पृथ्वीच्या लँडस्केपमध्येही बदल दिसून येत आहेत.

यामुळे सस्तन प्राण्यांची जीवनशैली बदलू शकते. पृथ्वीत दफन केलेले जीवाश्म खराब होऊ शकतात. याचा अर्थ असा की, पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग हलला जाऊ शकतो.

नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, गुरुत्वाकर्षणाच्या हाताळणीमुळे पृथ्वीवर अनेक बदल होत आहेत. हे सतत घडत असते. त्यांचा वेग कमी आहे, त्यामुळे लगेच काहीच दिसत नाही. पण जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक घटना घडते, तेव्हा या गोष्टीही कळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT