हिंदू धर्मात सत्यनारायण पुजेला खूप महत्व दिले जाते. हे व्रत दर महिन्याच्या पौर्णिमेला पाळले जाते. या दिवशी भगवान सत्यनारायण म्हणजेच विष्णू भगवानाची पुजा केली जाते. हे वर्त खूप पाळल्याने तुमच्या अडीअडचणी दूर होतात, तसेच हे व्रत खऱ्या मनाने केल्याने केल्यावर भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात. चला तर पाहुया काय आहे मुहूर्त, तारिख आणि पुजेची पद्धत.
सत्यनारायण व्रताची तारिख
ज्योतिषशास्त्रानुसार सत्यनारायण व्रत नोव्हेंबर २०२४ मध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जाणार आहे. यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६.१९ वाजता सुरु झाला आहे. याची समाप्ती १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे २.५८ ला होणार आहे.
सत्यनारायण व्रत २०२४ पुजा शुभ मुहूर्त
सत्यनारायण पूजा मुहूर्त: सकाळी ६.४४ ते १०.४५
अभिजीत मुहूर्त: सकाळी ११.४९ ते १२.३३
ब्रह्म मुहूर्त: सकाळी ५.०९ ते ५.५७
राहू काल: सकाळी १०.३० ते १२.११ ही वेळ सत्यनारायण पुजेसाठी शुभ मुहूर्त दर्शवणारी आहे.
सत्यनारायण व्रताची पूजा कशी करावी?
सत्यनारायणाच्या पूजेचा विधी अगदी लक्षपूर्वक केला तर तो लाभदायक असतो. या दिवशी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करावी. जमल्यास नवे वस्त्र परिधान करावे. घरातील देवारा स्वच्छ करावा. त्यात पुजेसाठी जागा करावी. मग सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. आता मंदिरात पिवळे कापड पसरवा आणि त्यावर सत्यनारायणाची मुर्ती ठेवा.
देवाच्या मुर्तीला गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करुन हळदीचा टिळा लावा. मग देवाला पिवळी फुले, फळे, मिठाई आणि फुलांचे हार अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावून पुजा करा. सत्यनारायण व्रताची कथा व्रत ऐकण्याची शपथ घ्या. आता शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करून पूजेची सागंता करा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav