kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

travel: दरवर्षी लाखो भाविक करतारपूर साहिबला भेट देतात. शीख धर्माव्यतिरिक्त इतर लोकही येथे जाऊ शकतात का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. यासाठी तिकीटाची किंमत किती आहे?
travel
kartarpur sahibyandex
Published On

भारतातील शीख धर्माचा इतिहास खूप जुना आहे. ज्याप्रमाणे सर्व धर्मांमध्ये महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. त्याचप्रमाणे शीख धर्मातही अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकी पाच तख्त म्हणजेच पाच गुरुद्वार सर्वात महत्त्वाचे आहेत. हे पाचही भारतात आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे 'श्री अकाल तख्त साहिब' जे अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात आहे. यानंतर 'श्री केशगढ साहिब' पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यात आहे. तर तिसरा तख्त पंजाबमधील भटिंडा येथील 'श्री दमदमा साहिब' आहे आणि चौथा तख्त 'श्री पटना साहिब' आहे जो पटना येथे आहे.

तर पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्रात सध्या असलेले तख्त श्री हजूर साहिब आहे. या गुरुद्वारांशिवाय शिखांसाठी आणखी एक महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. ते म्हणजे 'कर्तारपूर साहिब' जे सध्या पाकिस्तानात आहे. दरवर्षी लाखो भाविक करतारपूर साहिबला भेट देतात. शीख धर्माव्यतिरिक्त इतर लोकही येथे जाऊ शकतात का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. यासाठी तिकीटाची किंमत किती आहे? याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

travel
Guru Nanak Jayanti 2023 : गुरु नानकजींचा जन्म कधी आणि कुठे झाला? जाणून घ्या 'प्रकाश पर्व' साजरं करण्याचं कारण

कोण करतारपूर साहिबला जाऊ शकते?

शीख धर्मातील गुरुद्वारांमध्ये कोणताही धार्मिक भेदभाव दिसत नाही. तिथे कोणत्याही धर्माची व्यक्ती येऊ शकते. गुरुद्वारामध्ये चालणाऱ्या लंगरमध्ये भोजन करता येते. करतारपूर साहिबमध्येही धर्माबाबत कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. शीख धर्माव्यतिरिक्त कोणत्याही हिंदूला तिथे जायचे असेल तर तो तिथे जाऊ शकतो.

कोणत्या धर्माचे लोक तिथे जाऊ शकता?

कोणत्याही मुस्लिमाला तिथे जायचे असेल तर तो तिथे जाऊ शकतो. कोणत्याही जैनांना तिथे जायचे असेल तर तो तिथे जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पारशी, ख्रिश्चन आणि इतर धर्माचे लोकही करतारपूर साहिबला भेट देऊ शकतात. या पवित्र धार्मिक स्थळावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक बंधन नाही.

फी किती भरावी लागेल?

करतारपूर साहिब पाकिस्तानात आहे. ज्याचे संचालन भारत आणि पाकिस्तान दोन्ही करतात. हा संपूर्ण परिसर करतारपूर कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. करतारपूर हे पाकिस्तानच्या नारोवाल जिल्ह्यात येते. करतारपूर साहिब गुरुद्वारा आहे. भारतातून जाणारे भाविक व्हिसाशिवाय करतारपूरला भेट देऊ शकतात, परंतु करतारपूर साहिबला जाण्यासाठी त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ज्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. करतारपूर साहिबला जाण्यासाठी 20 डॉलर फी भरावी लागेल. जे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 1600 आहे.

Written By: Sakshi Jadhav

travel
Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com