गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला साजरी केली जाते. शीख समुदायासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गुरु नानक जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशभरातील सर्व गुरुद्वारांमध्ये विशेष वैभव दिसून येते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दिवशी गुरुद्वाराला रंगीबेरंगी दिवे आणि फुलांनी (Flower) सजवले जाते. यासोबतच कीर्तन, पारायण, सकाळची मिरवणूक काढण्यात येते. गुरु नानक जयंती याला गुरु परब आणि प्रकाश पर्व असेही म्हणतात.
गुरु नानक यांची जन्मतारीख आणि ठिकाण
मान्यतेनुसार गुरु नानकजींचा जन्म कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला (Purnima) झाला होता. त्यांचा जन्म 1469 मध्ये पंजाब प्रांतातील तलवंडी येथे झाला, जो आता पाकिस्तानात आहे. नानकजींचे जन्मस्थान आता नानकांना साहिब म्हणून ओळखले जाते. शीख समाजाच्या लोकांसाठी हे ठिकाण अतिशय पवित्र मानले जाते.
महत्व
गुरु नानकजींनी शीख धर्माचा पाया घातला होता, म्हणून त्यांना शिखांचे पहिले गुरु मानले जाते. नानकजींनी स्वतः 'इक ओंकार' हे पवित्र शब्द तयार केले. यांना लिहिले होते. शिखांसाठी या गुरुवाणीचे खूप महत्त्व आहे. यावर्षी गुरु नानक जयंती 27 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे.
त्याला प्रकाशपर्व का म्हणतात?
गुरु नानक यांनी आपले जीवन समाजासाठी समर्पित केले होते. त्यांनी जातीवाद निर्मूलनासाठी आणि लोकांना एकात्मतेने बांधण्यासाठी प्रवचन दिले. नानकजींनी समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचे काम केले होते, म्हणूनच गुरु नानक जयंती ही दिव्यांचा उत्सव म्हणूनही साजरी केली जाते.
'इक ओंकार'
स्वतः गुरु नानक देव यांनी दिला होता, याचा अर्थ देव एक आहे. शीखांसाठी एक ओंकार खूप महत्त्वाचा मानला जातो. यासोबतच गुरु नानक देव यांनीही लंगर सुरू केल्याचे मानले जाते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.