Sarva Pitru Amavasya 2025 Saam Tv
लाईफस्टाईल

Sarva Pitru Amavasya 2025: सर्व पितृ अमावस्येला तुळशीला अर्पण करा या गोष्टी, घरात येईल सुख- समृद्धी

Sarva Pitru Amavasya Tulsi Remedies: सर्व पितृ अमावस्येला तुळशीशी संबंधित उपाय केल्याने पितृदोष कमी होतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय अवश्य जाणून घ्या.

Manasvi Choudhary

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे. उदया म्हणजेच रविवारी २२ सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्या आहे. पितृपक्षाच्या समाप्तीला सर्व पितृ अमावस्या असे म्हणतात. याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे. ज्यामुळे हा दिवस आणखी खास आहे.

मराठी दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्यातील अमावस्येचा दिवस हा पूर्वजांच्या प्रस्थानाचा दिवस मानला जातो. पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण केल्याने आशीर्वाद मिळतात. पितृ पक्षात पूर्वजांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान या विधी करतात. ज्यांच्या मृत्यूची तारीख माहित नाही त्याना सर्व पितृ अमावस्येला महत्वाची आहे.

सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला समाधान आणि शांती मिळते. या दिवशी पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय केल्यास पितृदोष कमी होतो आणि कुटुंबात सुख- समृद्धी येते.

पिवळा धागा बांधा

धार्मिकतेनुसार, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पिवळा किंवा लाल धागा १०८ गाठी बांधा असे केल्याने कुटुंबात सुख, समृद्धी येते.

तुपाचा दिवा लावा

अमावस्येला तुळशीला पाणी अर्पण करा व संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे आणि सात किंवा अकरा वेळा प्रदक्षिणा मारा यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

लाल वस्त्र अर्पण करा

सर्व पितृ अमावस्येला तुळशीला लाल वस्त्र अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT