December Sankashti Chaturthi 2023 Muhurt Saam Tv
लाईफस्टाईल

Sankasht Chaturthi (Dec 2023) वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजा पद्धत

Sankashti Chaturthi 2023 In December : संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागानुसार महत्त्वाचा व्रत ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा ही संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्याच्या ३० तारखेला आली आहे.

कोमल दामुद्रे

December Sankashti Chaturthi Date:

संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचागानुसार महत्त्वाचा व्रत ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. यंदा ही संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्याच्या ३० तारखेला आली आहे.

हिंदू धर्मात बुद्धी आणि ज्ञानाची देवता गणपतीला (ganpati) विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रत्येक कार्यात पहिला मान दिला जातो. वर्षभरात १२ संकष्टी चतुर्थी येतात. तर प्रत्येक महिन्यात विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी, पूजा आणि पद्धत

1. संकष्ट चतुर्थी तिथी

पंचागनुसार मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थी तिथी ही ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.४३ वाजता सुरु होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबर २०२३ ला सकाळी ११.५५ मिनिटांनी संपेल. ही संकष्ट चतुर्थी सकाळी ३० डिसेंबरला साजरी (Celebrate) केली जाईल.

2. संकष्टी चतुर्थी 2023 मुहूर्त

  • पूजा मुहूर्त सकाळी ०८.०३ ते ०९.३० पर्यंत

  • संध्याकाळची वेळ - सायंकाळी ०६.१४ ते ०७.४६ पर्यंत

  • चंद्रोदयाची वेळ - रात्री ९. १० वाजता

3. पूजा विधी

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे

  • आंघोळ करुन स्वच्छ व धुतलेले कपडे घाला. त्यानंतर विधीवत गणेशाची पूजा करावी.

  • गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी.

  • त्यानंतर पूजेच्या वेळी तीळ, गूळ, लाडू, फुले, पाणी (Water), धूप, चंदन आणि केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे.

  • त्यानंतर गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करावेत.

  • श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही उपवास करत असाल तर तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT